सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांच्या अपेक्षा फोल ठरवनारा अर्थसंकल्प - पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर



चंद्रपूर:- (का. प्र.) महाराष्ट्र सरकार वतीने अर्थमंत्री   अजीत पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प अत्यंत निराशाजनक असुन मागिल सरकारने राज्यात बदल घडवून आनलेल्या अनेक चांगल्या योजनांना आधिच स्थगीती दिल्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांच्या जिवनात सकारात्मक बदल होतील ही अपेक्षा या अर्थसंल्पामुळे फोल ठरली आहे असे अर्थसंकल्पावर प्रतिक्रीया देताना पूर्व गृहराज्यमंत्री  हंसराज अहीर यांनी सांगीतले. ते पूढे म्हणाले की नुकत्याच सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात मागिल सरकारच्या ग्रामिण क्षेत्रा व शेतीविकासाला प्राधान्य दिल्यामुळे राज्याच्या कृषी विकासदरात वाढ झाल्याचे निदर्शनास आले असतांना त्यात सातत्य न राखल्यामुळे या अर्थसंकल्पाचा कृषी व शेतकऱ्यांना  फारसा फायदा होणार नसल्याचे स्पष्ट होते. विभीन्न विचारधारेच्या त्रांगड सरकारने सादर केलेला हा अर्थसंकल्प राज्यातील शेतकरी, कामगार, बेरोजगारांचा अपेक्षाभंग करणारा आहे.