लोकतंत्र की आवाज़, चंद्रपुर न्यूज़ नेटवर्क टीम
चंद्रपूर, 20 एप्रिल :कोरोना लाॅकडाऊनमुळे कापुस शेतकऱ्यांच्या घरामध्ये साठा झाला असुन खरेदी बंद असल्याने शेतकरी आर्थिक अडचनीत सापडला आहे. घरातील खोल्या कापसाने भरून असल्याने वापरात येत नाही आणि कोरोनाच्या या विषारी संक्रमनापासुन वाचण्याकरीता व घरातील अडचन आणि आर्थिक चनचन हे पाहता कापुस खरेदी करावा ही आग्रही मागनी असतांना सीसीआय ने कापुस खरेदी करण्याचे मान्य करूनही महाराष्ट्रात एपीएमसी च्या अनास्थेमुळे विलंब झाला.सुदैवाने आज जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या भेटीत कापुस खरेदी नियोजन पुर्ण झाले असुन कापुस खरेदी उद्यापासुन सुरू होनार असे जिल्हाधिकायांनी कळविले.
तसेच लाॅकडाऊनमुळे ऑटोचालक एक महिण्यापासुन घरी आहे. त्यांना ऑटो बंद असल्याने आर्थिक अडचन आहे. ऑटोचालकांना लाॅकडाऊन मध्ये सरकारचे पर्ण सहकार्य असुन गरीब ऑटोचालकांना धान्य आणि किराना कीट देण्याची मागनी जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य करून सर्व ऑटोचालकांची यादी आरटीओ ऑफीस ला पळताळनी होऊन त्यांना किराना कीट व धान्य देण्यात येईल तसेच बिपीएल सोबतच एपीएल धारकांनाही किराना सामान देण्याचा विचार करू असे जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली.