मुंबई , 31 मई : कोरोनामुळे देशात सुरु असलेला लॉकडाऊन केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. याबाबत केंद्राने कालच आपली नियमावली जाहीर केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन 5 ची नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीत कंटेन्मेंट झोन वगळता अन्य झोनमध्ये सूट देण्यात आली आहे.
पाहा कोणत्या टप्प्यात काय सुरु ?
तीन जूनपासून पहिल्या टप्प्यात
सायकलिंग, धावणे, चालणे अशा व्यायामांना परवानगी. सकाळी 5 ते संध्याकाळी 7 या वेळेत खाजगी किंवा सार्वजनिक मैदाने, समुद्र किनारे, बाग इत्यादी ठिकाणी व्यायामाला मुभा, केवळ इनडोर स्टेडियममध्ये परवानगी नाही
सामुहिक (ग्रुप) अॅक्टिविटीजना परवानगी नाही, लहान मुलांसोबत पालकांना थांबणे अनिवार्य, केवळ जवळच्या ठिकाणी व्यायाम करण्यास जाण्याची सूचना, मोकळ्या जागेतील गर्दीची ठिकाणे टाळावी
सायकलिंग करण्यास अधिक प्रोत्साहन, यातून शारीरिक व्यायामासोबत सोशल डिस्टन्सिंग पाळले जाते,
प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल अशा तंत्रज्ञ यांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर याचा वापर करुन काम करावे, गॅरेजची वेळ घेऊन वाहन दुरुस्ती कामे करावीत
सर्व सरकारी कार्यालये गरजेनुसार किमान 15 टक्के कर्मचारीवर्ग किंवा किमान 15 कर्मचारी (जे अधिक असेल ते) यामध्ये काम करतील
पाच जूनपासून दुसरा टप्पा
मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्सवगळता सर्व बाजार, दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत एकआड एक दिवस उघडतील.
1) ट्रायल रुम बंद राहतील. कपडे परत घेणे किंवा बदलून देणे, यांना मुभा नाही.
2) सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची जबाबदारी दुकानदारांची, त्यांनी होम डिलिव्हरी, टोकन सिस्टम, मार्किंग अशी पद्धत अवलंबावी.
3) जवळच्या बाजारात जाण्यासाठी पायी किंवा सायकलने जावे, आवश्यक खरेदीसाठी जवळच्या जवळ बाजारात जावे, खरेदीला जाण्यासाठी वाहनाचा वापर टाळावा.
4) टॅक्सी, कॅब, रिक्षा, चारचाकी – केवळ आवश्यक प्रवासासाठी चालक + 2, दुचाकी – केवळ चालक.
आठ जूनपासून तिसरा टप्पा
काय सुरु? काय बंद?
1) 10 टक्के कर्मचाऱ्यांसह खासगी कार्यालयं सुरु होतील
2) घरी आणि ऑफिसात पोहोचल्यानंतर सॅनिटायजेशन बंधनकार
3) स्टेडियमच्या आतमध्ये कुठलीही सामुहिक अॅक्टीव्हिटीज होणार नाहीत
4) टू व्हिलर 1, थ्री व्हिलर- 1+2 फोर व्हिलर 1+2 अशी खासगींना परवानगी
5) जिल्ह्या अंतर्गत बस वाहतूक सुरु राहील, 50 टक्के क्षमतेसह
6) आंतर जिल्हा बसेसना परवानगी नाहीच
7) सोशल डिस्टन्सिंग पाळून सर्व दुकानं उघडतील. 9 ते 5 अशा वेळेत
कंटेनमेंट झोनबाहेर जवळपास सर्व उघडणार
केंद्र सरकारने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार, कंटेनमेंट झोनमध्ये सर्व बंद असेल, मात्र त्याबाहेर अनेक मुभा देण्यात आल्या आहेत. यासाठी टप्प्याटप्प्याने सूट देण्यात आली आहे.