लाॅकडाऊन ५.० संदर्भात केंद्र सरकारची मोठी घोषणा , ३० जून २०२० पर्यंत राष्ट्रव्यापी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन चालू ठेवा; केंद्र सरकारचा आदेश,लाॅकडाऊनला नवे नाव अनलाॅक १,




लोकतंत्र की आवाज़, चंद्रपुर
 नवी दिल्ली , 30 मई :
देशातला लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. लॉकडाऊन ५.० हा फक्त कंटेनमेंट झोनपुरताच मर्यादित आहे. कंटेनमेंट झोनबाहेरील निर्बंध टप्प्याटप्याने कमी होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे कटेंनमेंट झोन वगळता ८ जूननंतर अटींसह धार्मिक स्थळे, हॉटेल रेस्टॉरंट, थिएटर, शॉपिंग मॉल टप्प्याटप्याने सुरु होणार आहेत. कर्फ्युची वेळ कमी करण्यात आली आहे. रात्री ९ वाजेपासून सकाळी ५ वाजेपर्यंत कर्फ्यु असणार आहे.


 
यावेळी लॉकडाऊनचे नियम काय असतील ते देखील सरकारने जाहीर केले आहे. कटेंनमेंट झोनच्या बाहेर काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली आहे. ही नवीन नियमावाली १ जून ते ३० जूनपर्यंत लागू राहणार आहे.

नव्या नियमानुसार रात्री कर्फ्यू लावला जाणार आहे. रात्री ९ वाजल्यापासून ते सकाळी ५ वाजेपर्यंत कर्फ्यू असणार आहे, मात्र अत्यावश्यक बाबींसाठी कर्फ्यूची बाधा राहणार नाही. याआधी संध्याकाली ७ ते सकाळी ७ पर्यंत कर्फ्यूची मर्यादा होती.


 
या लॉकडाऊनदरम्यान धार्मिक स्थळांना मुभा दिली जाणार आहे. ८ जूनपासून धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली जाणार आहे. मात्र कंटेनमेंट झोनमधील मंदिरे उघडण्यास परवानगी दिली जाणार नाही. काही राज्यांना मॉल देखील सुरु करायचे आहेत. मात्र त्याची परवानगी अद्याप दिलेली नाही.


 
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने भारत सरकारची मंत्रालये/विभाग, राज्य सरकारे व राज्य अधिकारी यांना, ३० जून २०२० पर्यंत राष्ट्रव्यापी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करणे चालू ठेवण्यास सांगितले आहे. मात्र या लाॅकडाऊन ५ मधून मोठ्या प्रमाणावर सवलती मिळणार असल्याचे संकेत देखील मिळत आहेत.

देशासह राज्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने परत एकदा देशात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला असून १ जून ते ३० जूनपर्यंत देशात लॉकडाऊन कायम राहणार आहे. देशात लॉकडाऊन वाढण्याचे स्पष्ट संकेत मिळत होते आणि तसेच झाले आहे. देशात कोरोना संकट गंभीर झाले आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढणार हे निश्चित होते. मात्र यावेळी लाॅकडाऊनचे नाव बदलून अनलाॅक १ असे करण्यात आले आहे.