चंद्रपूर जिल्ह्यातील आधार केंद्र सोमवारपासून सुरू करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश #चंद्रपुर-आधार-कार्ड



चंद्रपुर ,12 जून:
खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना पीककर्ज हवे आहे, महिलांना स्वयंरोजगार करण्यासाठी बँक किंवा काही कार्यालयात जायचे आहे, विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कामासाठी महाविद्यालयात प्रवेशासाठी कागदपत्रे मिळवायची आहेत आणि या सर्व शासकीय पातळीवर पहिले स्वतःचे ओळखपत्र म्हणून आधारकार्ड आवश्यक झालेय.

आणि कोरोनाबाधित महाराष्ट्र शासनाने सर्व आधारकार्ड केंद्र बेमुद्दत बंद केली आहेत.

नागरिकांची कामे खोळंबली आहेतच पण आधारकार्ड केंद्र चालवणाऱ्या युवकांना उपासमार सहन करावी लागते ती स्थिति भयंकर आहे.

आज घडीला शेतकरी,महिला,पुरुष बचत गट कर्जासाठी बँकेच्या उंबरठ्यावर कर्जासाठी मोठ्या आशेने उभा आहे , शेतीचा हंगाम समोर असताना पैशाशिवाय तो शेती करू शकत नाही , शेतीला लागणारे बी बियाणे खते घेण्यास पैशाअभावी असमर्थ आहे अश्या या नाजूक समयी आधार कार्ड शिवाय बँकेतील अधिकारी पैसे देऊ शकत नाही.

 आधार कार्ड काढायला त्यातील दुरुस्ती करायला आधार केंद्र बंद आहे,नवे आधारकार्ड घेणे किंवा दुरुस्ती बंद असल्याने नागरिकांना मोठा त्रास होत आहे.

दुसरीकडे आधार केंद्र बंद असल्यामुळे जिल्ह्यातील 82 आधार केंद्र चालकांना मागच्या तीन महिन्यापासून आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

 हि समस्या काही आधारकार्ड केंद्रचालकांनी श्री विजय सुधाकरराव गंपावार यांच्याकडे सांगितली त्यांनी आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार कडे ही समस्यां मांडली ती सुद्धा केवळ एका मोबाइल एसएमएस वर पण मा.सुधीरभाऊंनी या मॅसेजची तात्काळ दखल घेत याबाबत मा.जिल्हाधिकारी यांच्याकडे नागरिकांची व केंद्रचालकांची समस्या लक्ष्यात घेऊन तातडीने आधार केंद्र सुरू करावे अशी मागणी केली .

मा.जिल्हाधिकारी महोदयांनी सहानुभूती पूर्वक विचार करत  चंद्रपूर जिल्ह्याभरातील साधारण 82 आधार केंद्र सोमवारपासून सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. जनतेच्या अडचणी व आधारकार्ड चालकांची समस्या या निर्णयामुळे दूर होणार आहे.