चंद्रपूर जिल्हातील बाधीताची संख्या ४९ , ब्रम्हपुरी तालुक्यात आणखी एक पॉझिटीव्ह


 चंद्रपुर ,16 जून (जिमाका) :चंद्रपुर जिल्ह्यातील  ब्रह्मपुरी तालुक्यामधील मालडोंगरी गावातील एका युवकाचा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

 जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईवरून आलेल्या या १९ वर्षीय युवकाला संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते. 

त्याला लक्षणे दिसल्यानंतर ब्रह्मपुरी कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले. 

१५ जूनला त्याचा स्वॅब घेण्यात आला. हा युवक कोरोना बाधीत असल्याचे पुढे आले आहे.

त्यामुळे चंद्रपूर जिल्हयातील बाधीत रुग्णाची संख्या ४९ झाली आहे.

  काल चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील कृष्णनगर केरला कॉलनी परिसरात सोमवारी २५ वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता.

 हा युवक नवी दिल्ली येथून चंद्रपूरमध्ये दाखल झाल्यानंतर या युवकाचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले होते.      

  चंद्रपूरमध्ये आतापर्यत
 २ मे ( एक बाधीत ), 
१३ मे ( एक बाधीत) 
२० मे ( एकूण १० बाधीत ) 
२३ मे ( एकूण ७ बाधीत ) व 
२४ मे ( एकूण बाधीत २ )
 २५ मे ( एक बाधीत ) 
३१ मे ( एक बाधीत )
 २जून ( एक बाधीत )
 ४ जून ( दोन बाधीत ) 
५ जून ( एक बाधीत ) 
६जून ( एक बाधीत )
 ७ जून ( एकूण ११ बाधीत ) 
९ जून ( एकूण ३ बाधीत ) 
१०जून ( एक बाधीत ) 
१३ जून ( एक बाधीत ) 
१४ जून ( एकूण ३ बाधीत ) 
१५ जून ( एक बाधीत ) आणि 
१६ जून ( एक बाधीत )

अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधीत ४९ झाले आहेत.आतापर्यत २५ बाधीत बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. 

त्यामुळे ४९ पैकी अॅक्टीव्ह बाधीतांची संख्या आता २४ झाली आहे.