चंद्रपूर महानगरतील ,
दाताला, उर्जानगर, जानाला,
बल्लारपुर शिवजी वार्ड ,भद्रावतील , वरोरा (एकार्जुना), ब्रह्मपुरी (क़ुर्ज़ा)
आतापर्यंतची बाधित संख्या १८७;
९६ जण कोरोना आजारातून झाले बरे ;
९१ बाधितांवर उपचार सुरू
लग्न सोहळ्यातील ६ जणांचा समावेश
चंद्रपूर , 12 जुलाई (जिला माहिती कार्यालय, चंद्रपूर): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रविवारी एकाच दिवशी १८ बाधित पुढे आले आहेत. एका दिवसातील ही सर्वात मोठी संख्या आहे. त्यामुळे कालपर्यंत १६९ असणारी बाधितांची संख्या वाढून आता १८७ झाली.
जिल्ह्यात सध्या उपचारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९६ आहे. तर सध्या उपचार सुरु असणाऱ्या बाधितांची संख्या ९१ आहे. त्यापैकी ८ जण हे जिल्ह्याबाहेरील बाधित असून राज्य राखीव पोलीस दलाचे जवान आहेत. तर एक युवक उत्तर प्रदेशातील रहिवाशी आहे.
दरम्यान, जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात तपासणी मोहीम आरोग्य यंत्रणेने हाती घेतली आहे. बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाला संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात येत आहे. त्यामुळे बाधिताच्या संख्येत वाढ होत आहे. या सर्व बाधितांची योग्य वैद्यकीय तपासणी सुरू असून सर्व संक्रमित वैद्यकीयदृष्ट्या स्थिर आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता येणाऱ्या नागरिकांची माहिती द्यावी. तसेच वैद्यकीय उपचाराला योग्य प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून आज सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार आज पुढे आलेल्या १८ बाधितामध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील ७, चंद्रपूर ग्रामीण मधील ३, एकाच लग्न सोहळ्यातील संपर्कातून पॉझिटीव्ह झालेले भद्रावती तालुक्यातील वर पक्षातील ४ व मूल तालुक्यातील जानाळा येथील वधू पक्षातील एका महिलेचा समावेश आहे.
तसेच याच लग्न सोहळ्यात सहभागी झालेली बल्लारपूर येथील आणखी एक महिलेचा समावेश आहे. तसेच श्रीनगरवरून परत आलेला वरोरा तालुक्यातील ३० वर्षीय युवक व हैद्राबाद येथून प्रवासाचा संदर्भ असणारी ब्रम्हपुरी तालुक्यातील कुर्झा गावातील महिला अशा एकूण १८ बाधितांचा समावेश आहे.
चंद्रपूर शहरात आज पुढे आलेल्या बाधितामध्ये आकाशवाणी चौकातील एका कॉम्प्लेक्समधील ४९ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. यापूर्वी एमआयडीसीतील एका उद्योग समूहातील पॉझिटीव्ह ठरलेल्या बाधिताच्याच कंपनीत हा व्यक्ती देखील कार्यरत आहे.
याशिवाय डब्ल्यूसीएल कॉलनी ऊर्जानगर परिसरातील ४८ वर्षीय पुरुष, २० वर्षीय स्त्री व १५ वर्षीय मुलगा एकाच कुटुंबातील आहेत. ते यापूर्वीच्या ऊर्जानगर मधील एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले होते. त्यांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे.
तर चंद्रपूर शहरातीलच हनुमान मंदिर परिसरातील २० वर्षीय उत्तर प्रदेशातून आलेला एक मुलगा पॉझिटिव्ह ठरला आहे. आल्यापासून संस्थात्मक अलगीकरणात असणाऱ्या या मुलाचा दहा तारखेला स्वॅब घेण्यात आला होता. हा युवक उत्तर प्रदेशचा मूळ रहीवाशी आहे.
याशिवाय पोलीस लाईन मधील राज्य राखीव पोलीस दलाचे चार जवान पुन्हा पॉझिटिव्ह म्हणून पुढे आले आहेत. अनुक्रमे २७, २३, २५ व ५९ वर्षीय या जवानांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यापूर्वी पॉझिटीव्ह ठरलेले चार जवान व आजचे एकूण चार जवान व उत्तर प्रदेशातील एक युवक असे आतापर्यत ९ जन बाहेरील जिल्हा व राज्यातील पॉझिटीव्ह झाले आहेत.
चंद्रपूर ग्रामीण मधील दाताळा भागातील ५० वर्षीय महिला पॉझिटिव्ह म्हणून पुढे आली आहे. अमरावती शहरातून ही महिला परत आली होती. त्यानंतर दहा तारखेला या महिलेचा स्वॅब घेण्यात आला होता. तो आज पॉझिटिव्ह आला आहे.
जानाळा येथील लग्नामध्ये सहभागी झालेल्या भद्रावती येथील आणखी चार जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मूल तालुक्यातील जानाळा येथील विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या नवरदेवाचे वडील असणारे ६१ वर्षीय गृहस्थ, लग्नातील २२ वर्षीय आचारी , नातेवाईक असणारे ४७ वर्षीय पुरुष व ४७ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
याशिवाय मूल तालुक्यातील जानाळा येथील २५ वर्षीय एक महिला पुन्हा पॉझिटिव्ह ठरली आहे. याच विवाह सोहळ्यातील नवरीकडील ती नातेवाईक होती.
सायंकाळी जानाळा येथीलच लग्न सोहळ्यात सहभागी झालेली ३१ वर्षीय बल्लारपूर येथील शिवाजी वार्ड मधील महिला पॉझिटीव्ह ठरली आहे.११ जुलै रोजी या महिलेचे स्वॅब घेण्यात आले होते.
आज पुढे आलेला सतरावा पॉझिटिव्ह ३० वर्षीय युवक आहे. वरोरा तालुक्यातील एकार्जुना येथे जम्मू काश्मीर श्रीनगर मधून हा युवक 6 तारखेला परत आला होता.
आज पुढे आलेला अठरावा बाधित ही एक महिला असून ब्रह्मपुरी तालुक्यातील कुर्झा येथील रहिवासी आहे. हैदराबाद येथून प्रवास केलेल्या बाधिताच्या संपर्कातील ही महिला आहे.
दरम्यान , जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या वृत्तानुसार चंद्रपूरमध्ये आतापर्यत
२ मे ( एक बाधित )
१३ मे ( एक बाधित)
२० मे ( एकूण १० बाधित )
२३ मे ( एकूण ७ बाधित )
२४ मे ( एकूण बाधित २ )
२५ मे ( एक बाधित )
३१ मे ( एक बाधित )
२जून ( एक बाधित )
४ जून ( दोन बाधित )
५ जून ( एक बाधित )
६जून ( एक बाधित )
७ जून ( एकूण ११ बाधित )
९ जून ( एकूण ३ बाधित )
१०जून ( एक बाधित )
१३ जून ( एक बाधित )
१४ जून ( एकूण ३ बाधित )
१५ जून ( एक बाधित )
१६ जून ( एकूण ५ बाधित )
१७जून ( एक बाधित )
१८ जून ( एक बाधित )
२१जून ( एक बाधित )
२२ जून ( एक बाधित )
२३ जून ( एकूण ४ बाधित )
२४ जून ( एक बाधित )
२५ जून ( एकूण १० बाधित )
२६ जून ( एकूण २ बाधित )
२७ जून ( एकूण ७ बाधित )
२८ जून ( एकूण ६ बाधित )
२९ जून ( एकूण ८ बाधित )
३० जून ( एक बाधित )
१ जुलै ( २ बाधित )
२ जुलै ( २ बाधित )
३ जुलै ( ११ बाधित )
४ जुलै ( एकूण ५ )
५ जुलै ( एकूण ३ )
६ जुलै ( एकूण ७ )
८ जुलै ( एकूण ५ )
९ जुलै ( एकूण १४ )
१० जुलै ( एकूण १२ )
११ जुलै ( एकूण ७ ) व
१२ जुलैला ( एकूण १८ )
अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधित १८७ झाले आहेत. आतापर्यत ९६ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे.
त्यामुळे १८७ पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता ९१ झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.