चंद्रपूर , 16 जुलाई (का प्र): पोंभुर्णा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये खोटया दस्ताऐवजांच्या आधारे प्रशासक म्हणुन पदग्रहण केल्याबाबत माहिती मिळाली असता माहितीच्या अधिकाराखाली कागदपत्राची मागणी केली व त्या दस्ताऐवजांचे अवलोकन केले असता गैरअर्जदाराने कागदपत्रात हेराफेरी करून शासनासह तालुक्यातील शेतकर्यांची फसवणूक करून प्रशासकाचे पद ग्रहण केले असे लक्षात आले असुन आशिष विलास कावटवाार तसेच अतिक अहेमद कुरेशी ह्यांनी संचालक पदावर नियुक्ती मिळविली आहे असा थेट आरोप उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजु झोडे ह्यांनी केला असुन ह्या दोघांविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्याचप्रमाणे ह्या दोघांविरुद्ध पोलीस तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली असल्याचे त्यांनी डिजिटल मीडिया असोसिएशन च्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
सविस्तर वृत्त असे की, चक घोसरी येथील श्री. दामोदर येल्ला चिमलवार यांच्या सर्वे नं.123/1 या जमीनीच्या सातबारावर खोडतोड करून गाव चक घोसरीच्या ऐवजी थेरगाव तसेच तालुका मुल च्या ऐवजी पोंभुर्णा केले व दामोदर येल्ला चिमलवार यांच्या सोबत लिलाबाई विलास कावटवार व आशिष विलास कावटवार असे खोटे नाव संगणकादवारे केले आणि तो खोटा सातबारा खरं आहे म्हणुन दि. 4/2/2020 रोजी विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्या समक्ष शपथपत्र केले आणि खोटया दस्ताऐवजांच्या आधारे प्रशासक पद ग्रहण करण्याकरीता खरे दस्ताऐवज म्हणुन उपयोग केले. तसेच अतिक अहेमद कुरेशी हे जनता विदयालय, पोंभुर्णा येथे शिक्षक म्हणुन नोकरी तसेच नगरपंचायत पोंभुर्णा येथे नगरसेवक या पदावर असताना सुध्दा फक्त शेती व्यवसाय करतो म्हणुन खोटे शपथपत्र सादर केले. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती व शासनासोबत धोकाधडी व फसवेगीरी केली आणि जो कोणी खरा उमेदवार होता त्याला त्याच्या लाभापासुन वंचीत ठेवले. स्वतःच्या अवैध फायदया करीता खोटे दस्ताऐवज तयार करून खरे आहे म्हणुन उपयोग केला म्हणुन गैरअर्जदारावर फौजदारी कारवाई करण्यात यावी.