चंद्रपूर, 12 ऑक्टोबर (का प्र): चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 12233 झाली आहे. गेल्या 24 तासात 156 नवीन बाधित पुढे आले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात आत्तापर्यंत 8977 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.
सध्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 3069 बाधित उपचार घेत आहे.
आतापर्यंत 8977 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील 178 सह एकूण 187 कोरोना बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.