चंद्रपूर, 13 ऑक्टोबर (का प्र): चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 12431 झाली आहे. गेल्या 24 तासात 198 नवीन बाधित पुढे आले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात आत्तापर्यंत 9359 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.
सध्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 2882 बाधित उपचार घेत आहे.
आतापर्यंत 9359 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील 181 सह एकूण 190 कोरोना बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.