पहिला मृत्यू : भद्रावती येथील 67 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 1 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .
दुसरा मृत्यू : साईबाबा वार्ड , बल्लारपूर येथील 59 वर्षीय महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे . या बाधितेला 18 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .
तिसरा मृत्यू : आकाशवाणी चौक , चंद्रपुर येथील 68 वर्षीय महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे . या बाधितेला 11 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .
चवथा मृत्यू : बालाजी वार्ड , चंद्रपुर येथील 50 वर्षीय महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे . या बाधितेला 1 ऑक्टोंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .
( गेल्या 24 तासातील हे वरील चार मृत्यू आहेत . चारही मृत्यू झालेल्या बाधितांना कोरोनासह न्यूमोनियाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे . )
आतापर्यंत मृत्यू झालेले बाधित 167 ( चंद्रपूर 158 , तेलंगाणा 01 , बुलडाणा 01 , गडचिरोली 03 , यवतमाळ 03 , आणि भंडारा 01).