बाधितांची एकूण संख्या 12431;
उपचार सुरु असणारे बाधित 2882
जिल्ह्यात 24 तासात 198 बाधित; 3 बाधितांचा मृत्यू
चंद्रपूर, दि. 13 ऑक्टोंबर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात आणखी 198 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 12 हजार 431 झाली आहे. यापैकी 9 हजार 359 कोरोना बाधितांना आतापर्यंत बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली असून 2 हजार 882 कोरोना बाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत.
आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासामध्ये तीन कोरोना बाधिताचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये, लालपेठ कॉलरी, चंद्रपूर येथील 60 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 10 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.
दुसरा मृत्यू सावली येथील 59 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 2 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.
तर, तिसरा मृत्यू सिंदेवाही येथील 54 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 12 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. तीनही बाधितांना कोरोनासह श्वसनाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 190 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 181, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन, यवतमाळ तीन आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये
चंद्रपूर शहर व परिसरातील 60,
बल्लारपूर तालुक्यातील 15,
चिमूर तालुक्यातील 2,
मुल तालुक्यातील 14,
गोंडपिपरी तालुक्यातील 3,
कोरपना तालुक्यातील 9,
ब्रह्मपुरी तालुक्यातील 16,
नागभीड तालुक्यातील 29,
वरोरा तालुक्यातील 22,
भद्रावती तालुक्यातील 2,
सावली तालुक्यातील 1,
सिंदेवाही तालुक्यातील 12,
राजुरा तालुक्यातील 6,
तेलंगाणा 1 तर
गडचिरोली येथील सहा असे एकूण 198 बाधित पुढे आले आहे.
या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:
चंद्रपूर शहर व परिसरातील
तुकुम,
जगन्नाथ बाबा नगर,
घुटकाळा,
भिवापूर वार्ड,
अंचलेश्वर वार्ड,
ऊर्जानगर,
सरकार नगर,
रामनगर,
कृष्णा नगर,
भिवापूर वार्ड,
घुग्घुस,
समाधी वार्ड,
जलनगर,
सिस्टर कॉलनी
परिसरातून पॉझिटीव्ह पुढे आले आहे.
ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:
बल्लारपूर तालुक्यातील पेपर मिल परिसर, बालाजी वार्ड, दादाभाई नौरोजी वार्ड, फुलसिंग नाईक वार्ड, नांदगाव पोडे, राणी लक्ष्मी वार्ड, सरदार पटेल वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे.
राजुरा तालुक्यातील विवेकानंदनगर, शिवाजीनगर, जवाहर नगर भागातून बाधित ठरले आहे.
वरोरा तालुक्यातील सहारा पार्क, मालवीय वार्ड, बावणे लेआउट परिसर, विठ्ठल मंदिर वार्ड, बोर्डा, राम मंदिर वार्ड, जिजामाता वार्ड, अभ्यंकर वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील कपिलवास्तू नगर, विदर्भ टाऊन परिसर, पद्मापूर भुज, ओमकार नगर, शांतीनगर, टिळक नगर, विद्यानगर परिसरातून बाधित ठरले आहे.
भद्रावती तालुक्यातील ओमकार नगर, अशोक नगर, सुमठाणा, शिवाजीनगर परिसरातून बाधित पुढे आले आहे.
सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव, पळसगाव, रत्नापूर हेटी, वासेरा भागातून बाधित ठरले आहे.
नागभीड तालुक्यातील वाढोणा, बाळापुर, तळोधी, मेंढा, कन्हाळगाव, कोजबी, गिरगाव, मिडांळा परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.
चिमूर तालुक्यातील क्रांतीनगर, चिखलापुर, भागातून बाधित पुढे आले आहे.
मुल तालुक्यातील कारवां,राजोली परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.