विश्रामगृहात अधिकाऱ्यांची बैठक: कोरोनाबाधिताची लूट तातडीने थांबवण्याचे खासदारांचे निर्देश
चंद्रपूर, 10 ऑक्टोबर : चंद्रपूर जिल्हयात काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाटयाने वाढत चालली आहे. त्याची दखल घेत प्रशासनाने शहरातील सोळा खासगी दवाखाने अधिग्रहित केले आहे. मात्र, या रूग्णालयातून बाधितांची लुट सुरू असल्याच्या तक्रारी मिळत आहेत. त्याची दखल खासदार बाळू धानोरकर यांनी घेतली. शनिवारी विश्रामगृहात तातडीने बैठक घेत लूट थांबविण्याचे निर्देश दिले. एक दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना मनपा आयुक्तांना दिल्या.
चंद्रपूर जिल्हयात कोरोनाबाधितांची संख्या अकरा हजारावर पोहोचली आहे.आतापयेत आठ हजार चारशे छतीस रूग्ण बरे झाले तर तीन हजार एकशे अठेचाळीस रूग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता चंदपूर शहरातील सोळा रुग्णालय अधिग्रहित करण्यात आली आहेत. येथे अनेकजण उपचार घेत आहेत. उपचार घेणारयांची परिस्थिती बेताचीच आहे. मात्र जीव वाचविण्यासाठी अनेकांचा आटापिटा सुरू आहे.
या परिस्थितीत रूग्णांची खासगी रूग्णालयांतून लूट सुरु आहे. पीपीई किटची किमत पाचशे रूपये आहे. मात्र बाराशे ते पंधराशे रूपये या किटसाठी खासगी रूग्णालयातून घेतले जात आहे. कोरोनाबाधितांच्या रक्त तपासण्या करण्यात येतात. त्यासाठी अव्वाच्या सव्वा पैसे घेतले जात आहे. अशीच लूट रूग्णवाहिकाधारक करीत आहे. कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे आधीच लोकांच्या हाती पैसे नाही. कसेतरी लोक जीवन जगत आहेत. त्यात उपचाराच्या नावाने अधिग्रहित करण्यात आलेल्या खासगी रुग्णालयातून रूग्णांची लूट सुरू आहे.
तशा तक्रारी मोठ्या प्रमाणावर पाप्त झाल्या. त्यामुळे खासदार धानोरकर यांनी विश्रामगृहात बैठक घेतली. या बैठकीला चंद्रपूर शहर महानगर पालिका आयुक्त राजेश मोहीते, ज्येष्ठ नेते विनोद दत्रात्रय, मनपाचे वैदकीय अधिकारी अविष्कार खंडारे, जिल्हाध्यक्ष ओबीसी कमेटी उमाकांत धांडे यांची उपस्थिती होती.
खासगी रुग्णालयावर नियंत्रण ठेवण्यासाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकाने प्रामाणिकपणे काम करावे. खासगी रुग्णालये रुग्णांना जी बिले देत आहेत. त्याची तपासणी करावी. जास्त बिल कुणी देत असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी, अशा सूचना खासदारांनी अधिकारयांना दिल्या. एका दिवसांत लुटीच्या या प्रकरणाचे चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले