ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचा निकाल घोषित
चंद्रपूर ७ ऑक्टोबर - चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे जिल्ह्यातील इयत्ता १ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी ” कोव्हीड - १९ " काळातील प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वच्छता अभियानाचे महत्व ” या विषयावर ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला असून, महानगरपालिका शाळेच्या विद्यार्थ्यांनी यात मोठया प्रमाणात सहभाग नोंदविला.
कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या शाळा बंद आहेत ,पण विद्यार्थी तथा पालकामध्ये या काळात स्वच्छता अभियान मोहिमेद्वारे केले जाणाऱ्या विविध उपायांबद्दल जाणीव व जागृती होण्यासाठी ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धा तीन गटात घेतल्या गेली यात अ गटात इयत्ता १ ली ते इयत्ता 5 वी मधील एकूण ९२ विद्यार्थी, ब'गटात इयत्ता 6 वी ते 8 वी तील एकूण३०विद्यार्थी आणि 'क'गटात इयत्ता ९ वी ते 12 वी मधील एकूण २० विद्यार्थ्याचा समावेश होता .
या चित्रकला स्पर्धेत तीनही गट मिळून एकूण १४२ स्पर्धकाने भाग घेतला .आणि विशेष म्हणजे चंद्रपूर शहरमहानगरपालिका शाळांचा यात उस्फुर्त सहभाग होता. प्रत्येक गटातून उकृष्ट दोन चित्रांची निवड करण्यात आली.
सदर स्पर्धेचे परीक्षण श्री राहुल मुपिडवार ( M.F.A. in creative and Paintings ) आणि श्री.आदर्श गजभिये ( M.F.A. in creative and Paintings ) या परीक्षकांनी केले. निवड झालेल्या स्पर्धकांची नावे याप्रमाणे आहे अ गटातून प्रथम क्रमांक:-स्वप्नील कुमार (नारायणा विद्यालयम चंद्रपूर ),द्वितीय क्रमांक १) विहान टिपले (रयतवारी कालरी मनपा चंद्रपूर) 2) वैष्णवी कोसरे (पंडित जवाहरलाल नेहरू मनपा शाळा चंद्रपूर ) तर ब गटातून प्रथम क्रमांक क्रतुजा जुमडे (लोकमान्य टिळक कन्या विद्यालय चंद्रपूर), द्वितीय क्रमांक - शीतल मेश्राम (सावित्रीबाई फुले मनपा शाळा चंद्रपूर) आणि क गटातून प्रथम क्रमांक मीनल
चीकनकर (एफ.ई.एस.गर्ल्स हायस्कूल चंद्रपूर),द्वितीय क्रमांक क्षितीज वनकर (नेहरू कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर).
या विजेत्या स्पर्धकांना चंद्रपूर शहर महानगरपालिका,चंद्रपूर यांच्यामार्फत योग्य बक्षीस मिळणार आहे.
सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर सौ. राखी कंचर्लावार,आयुक्त श्री. राजेश मोहिते,उपायुक्त श्री. विशाल वाघ व प्रशासकीय अधिकारी ,स्वंयसेवी संस्था तथा सर्व शिक्षक व स्पर्धकांचे पालक यांचे उत्कृष्ट सहकार्य लाभले. शाळा बंद असतानाही ऑनलाईनच्या माध्यमातून सर्वांच्या सहकार्याने सदर स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल या स्पर्धेचे सर्वत्र कौतुक होत आहे.