चंद्रपूर : कोविड १९ रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असलेले रेडमीसिवीरचे इंजेक्शन व पीपीई शासनाने निर्धारित केले आहेत. निश्चित दारातच सर्वत्र उपलब्ध करून देण्यात येत असून हि बाब खाजगी रुग्णालयांना बंधनकारक आहे. काळाबाजार रोखण्यासाठी स्थानिक स्थरावर विशेष पथके निर्माण करून लूट थांबविण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी, अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक, महानगर पालिका आयुक्त यांना केल्या.
आरोग्य विभागाने खाजगी रुग्णालयासाठी रेमडीसिवीरच्या १०० मिलिग्रॅम इंजेक्शनच्या एक कुपीची किंमत २३६० रुपये व पीपीई किटचे १० दिवसाचे ४५०० रुपये याप्रमाणे दर निश्चित केली असून, प्रत्येक जिल्ह्यात नेमून दिलेल्या औषधांच्या दुकानांमध्ये उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या तसेच या औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी पुरवठा पद्धती निर्माण करण्याचे आदेश सरकारने दिले आहे.
माध्यम, तीव्र लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना दिले जाणारे रेमडीसीवीर इंजेक्शन सरकारी रुग्णालयात मोफत मिळत असले तरी खाजगी रुग्णालये आणि औषध दुकानांत अव्वाच्या सव्वा दर आकारले जात आहेत. रुग्णाच्या नातेवाईकांना ते अन्य ठिकाणाहून आणण्यास सांगितले जाते. मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने याचा काळाबाजार केला जात असल्याने नातेवाईकांना हे मिळविण्यासाठी बरीच कसरत करावी लागते. हि लूट थाबिण्यासाठी पथक स्थापन करण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी दिल्या.
रेमडीसिवीर इंजेक्शन असे उपलब्ध होईल
रुग्णांसाठी रेमडीसीवीरची आवश्यकताअसल्यास खासगी रुग्णालयांनी शहरातील आरोग्य किंवा वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक राहील. यात इंजेक्शनची चिट्ठी, रुग्णाच्या कोरोना अहवाल, आधार किंवा इतर फोटो असलेल्या प्रमाणपत्र, रुग्णाची वैद्यकीय माहिती द्यावी लागणार आहे.