चंद्रपुर/बल्लारपुर : बल्लारपुर शहरातील स्लज गार्डन च्या परिसरातील पुराना धोबीघाट जवळ सुनील सिमलवार वय - 27 वर्ष रा. महाराणा प्रताप वॉर्ड, बल्लारपूर यांचा मर्डर झाल्याची माहिती आहे.
विश्वसनीय सूत्राच्या माहिती नुसार आज सायंकाळी 7 ते 8 वाजताच्या सुमारास सदर घटना घडल्याची माहिती असून सदर कृत्य आपसी मतभेदांमुळे घडल्याची माहिती असून मृतकाच्या चेहऱ्यावर मार असल्याचे प्रत्यक्षदर्शीच्या माहिती आहे.
बल्लारपूर शहरात वाढत्या गुन्हेगारी मुळे पोलिसांसमोर अनेक प्रश्न निर्माण होत आहे तसेच पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूर पोलीस करीत आहे.