108 नव्याने पॉझिटिव्ह ; दोन मृत्यू
आतापर्यंत 19,497 बाधित झाले बरे
उपचार घेत असलेले बाधित 1,207
चंद्रपूर, दि. 9 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 276 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
तर 108 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 21 हजार 33 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 19 हजार 497 झाली आहे.
सध्या एक हजार 207 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 57 हजार 607 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 34 हजार 533 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यांमध्ये गडचिरोलीच्या चार्मोशी तालुक्यातील 75 वर्षीय पुरूष व
बापट नगर, चंद्रपूर येथील 74 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 329 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 303, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 15, यवतमाळ सात, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या 108 रुग्णांमध्ये
चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 41,
चंद्रपूर तालुक्यातील 13,
बल्लारपुर एक,
भद्रावती पाच,
ब्रम्हपुरी तीन,
नागभीड पाच,
मुल दोन,
राजुरा एक,
चिमुर सात,
वरोरा 25,
कोरपना एक
तसेच इतर ठीकाणच्या चार रुग्णांचा समावेश आहे.
नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.