चंद्रपूर : महानगरातील जटपुरा गेटवरील वाहतूक कोंडी नित्याचीच अडचण झाली आहे. या वाहतुक कोंडीमुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे या समस्येवर चर्चा व उपाय शोधण्यासाठी चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्या पुढाकारातून चंद्रपुरातील विविध सामाजिक संघटनांची एकजूट झाली आहे. विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची १५ फेब्रुवारी रोजी भारती हॉस्पीटलमध्ये प्रसिद्ध विधीश अॅड. प्रशांत खजांची यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली, प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध वास्तुविशारद रमाणिकभाई चव्हाण व चंद्रपुर बचाव संघर्ष समिति चे अध्यक्ष डॉ. गोपाल मुंधडा उपस्थित होते.
सदर बैठकीत जटपुरा गेटवरील वाहतूक कोंडीवर कायमचा उपाय शोधण्यासाठी चर्चा करण्यात आली. आकीटेक्ट रमणिकभाई चव्हाण यांनी यासंदर्भात २० वर्षापासून आपण राजकीय नेते व प्रशासकीय अधिकार्यांकडे वाहतूक आराखडा तयार करून दिल्याचे सांगितले. तो आराखडा यावेळी त्यांनी बैठकीत समजावून सांगितले.
तर प्रसिद्ध विधीज्ञ अॅड. प्रशांत खंजाची यांनी यासंदर्भात कायदेशीर बाबी समाजावून सांगत पुन्हा सर्व संघटनांनी एकत्र येवून लोकचळवळ उभी करण्याचे आवाहन केले. यासंबंधात उच्च न्यायालयातही दाद मागण्यासंदर्भात माहिती दिली. यूवा ऑर्कीटेक्ट आनंद मुधंडा यांनी कोणताही बदल न करता सध्या अस्तीत्वात असलेल्या रस्त्यात किंचीत बदल करुन एक आराखडा तयार केला. यावर सर्वांचे जवळपास एकमत झाले तर चंद्रपुर बचाव संघर्ष समिति चे अध्यक्ष डॉ. गोपाल मुंधडा, यांनी सर्वांचे स्वागत करून बैठकी मागील पार्श्वभूमी सांगितली.
सदर बैठकीत जटपुरा गेटवरील कोंडी कायमची कशापाध्तीने सोडविता येईल यासंदर्भात संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपले प्लान व मत व्यक्त केले आता सर्व संघटनांनी एकत्र येवून हा प्रश्न कायमचा मार्गी लावण्याचा निर्धार केला हि समस्या लोकप्रतिनिधी व प्रशासकीय स्तरावरून सोडविण्यासंदर्भात सतत पाठपुरावा करण्याचे यावेळी ठरविण्यात आले.
या बैठकीत एमआयडीसी असोशिएनचे अध्यक्ष मधुसूदन रुगठा, स्नेहकीतचे अध्यक्ष डॉ. राजीव देवईकर व्यापारी असोशीएनचे अध्यक्ष रामजीवन परमार जेष्ठ नागरिक संघाचे किशन झाडे, विंजय चंदावर, संगीडवार, माणिकराव गोहोकार, रोटरी क्लबचे अध्यक्ष महेश उचके, रोटरी क्लब चांदा फोर्टचे अध्यक्ष अनिल व्यास, लायोंस क्लबचे अध्यक्ष श्याम धोपटे, माजी अध्यक्ष डॉ.मनीष मुंधडा, जेसीआयचे अध्यन आनंद मुंधडा, आयएमएचे अध्यक्ष डॉ अनिल माडूरवार, दंतरोग तज्ञ डॉ श्याम गुंडावार, रेडक्रॉसचे डॉ. भानुदास दाभेरे, आयएमएचे डॉ. बालमुकुंद पालीवाल, डॉ. किरण देशपांडे, डॉ. भूपेश भलमे, डीजीटल मिडियाचे अध्यक्ष जितेंद्र चोरडिया, व्हॉइस ऑफ़ युथ क्लबचे अध्यक्ष अरविंदरर्सिग धुन्ना, विठाई संस्थेच्या संजीवनी कुबेर, वनश्री मेश्राम, डॉ. सपन दास, शिशीर हालदार, अॅड. आशिष मुंधडा, यांचासह इतर संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
जटपुरा गेटवरील वाहतूक कोंडी ही चंद्रपूरकरांसाठी डोकेदुखी झाले असुन यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. प्रास्ताविक डॉ.किरण देशपांडे यांनी तर आभार वनश्री मेश्राम यांनी मानले.