2021 मधील सर्वाधिक रुग्ण आज
देशातील सर्वाधिक प्रभावित 10 शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील तब्बल 9 शहर
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील आज 2021 मधील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. आज दिवसभरात 31 हजार 855 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात 15 हजार 98 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दिवसभरात 95 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यात सध्या 2 लाख 47 हजार 299 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील आतापर्यंतचा कोरोना रुग्णांचा आकडा 25 लाख 64 हजार 881वर जाऊन पोहोचला आहे. त्यातील 22 लाख 62 हजार 593 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 53 हजार 684 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.
देशातील सर्वाधिक प्रभावित 10 शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील तब्बल 9 शहर:
देशात कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित पहिल्या 10 शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील तब्बल 9 शहरांचा समावेश आहे. तर एक शहर कर्नाटक राज्यातील आहे. अशावेळी महाराष्ट्र सरकारकडून अधिक कठोर निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. तसे संकेत खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.
कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित महाराष्ट्रातील शहरे
पुणे
नागपूर
मुंबई
ठाणे
नाशिक
औरंगाबाद
नांदेड
जळगाव
अकोला