चंद्रपूर : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य पुन्हा लॉकडाउन च्या सुचनेने होरपळत आहे , एकीकडे रोज कोरोना बाधितांच्या रुग्णात वाढ होत आहे तर दुसरीकडे कोरोना लसीकरण सुद्धा सुरू आहे मात्र या लसीकरणाचा फटका डॉक्टरांना सुद्धा बसत आहे . कोरोना लसीकरणाचे 2 डोज घेतल्यावर सुद्धा डॉक्टरच बाधित झाले असून आरोग्य यंत्रणा बुचकळ्यात पडली आहे .चंद्रपूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . राजकुमार गहलोत यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दोन डॉक्टरांना करोनाची लागण झाली आहे . लसीच्या दोन मात्रा घेतल्यानंतरही चंद्रपूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत , डॉ.अनंत हजारे व त्यांच्या पत्नी डॉ . श्रीमती हजारे बाधित झाल्या आहेत . डॉ . गहलोत यांनी कोविशिल्ड लसीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवसांनी त्यांना करोनाची लागण झाली . विशेष म्हणजे , दोन्ही मात्रा घेऊन त्यांना ४२ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे . कोरोना बाधित झालो असलो तरी कोविशिल्ड लस अतिशय चांगली व सुरक्षित असल्याचा दावा डॉ . गहलोत यांनी केला आहे याशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत हजारे व त्यांच्या पत्नी यांनीही कोविशिल्ड लस घेतली . डॉ . हजारे यांनी दिलेल्या माहितीनुसार , त्यांनी पहिली लस २४ जानेवारी रोजी तर दुसरी लस २३ फेब्रुवारी रोजी घेतली . या दोघांनाही लस घेऊन ५५ दिवसांचा कालावधी मात्र पूर्ण झालेला नाही असे त्यांनी सांगितले.
साभार- News34