गडचिरोली,(जिमाका)दि.14 अप्रैल: आज गडचिरोली जिल्हयात 305 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 71 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 13257 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 10924 वर पोहचली. तसेच सद्या 2168 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.
आत्तापर्यंत गडचिरोली जिल्हयात एकुण 165 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.
आज 8 नवीन मृत्यूमध्ये
चंद्रपुर जिल्ह्य ता. चिमुर सावरगांव येथील 69 वर्षीय पुरुष,
गडचिरोली तालुक्यातील 46 वर्षीय महिला, तालुका आरमोरी जि. गडचिरोली येथील 51 वर्षीय पुरुष,
चंद्रपुर जिल्ह्य ,तालुका ब्रम्हपुरी येथील 60 वर्षीय महिला,
तालुका अहेरी जि. गडचिरोली येथील 61 वर्षीय पुरुष,
ता. भामरागड जि. गडचिरोली येथील 52 वर्षीय पुरुष,
नागपूर जिल्ह्यातील 86 वर्षीय महिला तसेच
ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील प्रीटर्म बेबी यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे.
यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.40 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 16.35 टक्के तर मृत्यू दर 1.24 टक्के झाला.
नवीन 305 बाधितांमध्ये
गडचिरोली तालुक्यातील 149,
अहेरी तालुक्यातील 6,
आरमोरी 28,
भामरागड तालुक्यातील 5,
चामोर्शी तालुक्यातील 12,
धानोरा तालुक्यातील 10,
एटापल्ली तालुक्यातील 10,
कोरची तालुक्यातील 12,
कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 19,
मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 3,
सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 3
तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 48 जणांचा समावेश आहे.
तर आज कोरोनामुक्त झालेल्या 71 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 46, अहेरी 1, चामोर्शी 2, धानोरा 1, मुलचेरा 1,सिरोंचा 14, कोरची 2, कुरखेडा 2, तसेच वडसा 2 येथील जणाचा समावेश आहे.