7 हजार 266 आज कोरोनावर मात
7 हजार 229 कोरोना पॉझिटिव्ह
आज 98 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
नागपूर ,21 अप्रैल : महाराष्ट्र राज्यातील कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदीसह कठोर निर्बंध लावण्यात आलेत. पण कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यांचं प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. नागपुरात तर गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या अधिकाधिक चिंताजनक बनत चालली आहे. नागपुरात आज तब्बल 98 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागपूरकरांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत असल्याचं विदारक चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
नागपुरात गेल्या 24 तासांत 7 हजार 229 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 7 हजार 266 जणांची आज कोरोनावर मात केल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
आजच्या आकडेवारीसह नागपुरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 43 हजार 589 वर पोहोचली आहे. त्यातील 2 लाख 65 हजार 457 जणांनी कोरोनावर मात केलीय.
तर नागपुरात आतापर्यंत 6 हजार 575 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.