चंद्रपूर दि. 26 एप्रिल : राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री ना.अमित विलासराव देशमुख दि.27 एप्रिल 2021 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार, दि. 27 एप्रिल 2021 रोजी सकाळी 9:00 वाजता मोटारीने चंद्रपूरकडे प्रयाण करतील.
सकाळी 12:00 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव.
12:15 वाजता, चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भेट देतील.
दुपारी 12:30 वाजता, जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे अधिकार्यांसमवेत कोविड आढावा बैठक घेणार आहेत.
दुपारी 1:30 वाजता, जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद घेतील.
दुपारी 2:00 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव राहतील व दुपारी 3:00 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण करतील.
0000