कोरोना रुग्णांना योग्य सुविधा व औषधोपचार करा : पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची मागणी
उद्या जिल्हाधिकारी अजय गुल्हने यांना जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भेटणार
भेटीच्या माध्यमातून हंसराज अहीर पुढील मागण्या जिल्हा प्रशासनासमोर मांडणार
चंद्रपुर: चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रभाव तथा संक्रमितांची संख्या पाहता रुग्ण सेवेत मोठी व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. वाढत्या रुग्ण आकडेवारीसोबत जिल्ह्यातील कोविड १९ रुग्णांकरिता सुविधा व व्यवस्थेतही वाढ करण्याची नितांत गरज आहे. जिल्ह्यातील वैद्यकीय व्यवस्था प्रबळ होत नसून रुग्णांना तसेच त्यांच्या परिवाराला अनेक अडचणींना आज सामोरे जावे लागत असल्याने या विरोधात जनमाणसांचे प्रतिनिधित्व करीत कोरोना काळ नियमांचे पूर्णतः पालन करीत जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर जिल्हाधिकारी महोदयांना दि. १६ एप्रिल रोजी सकाळी १०.३० ते ११. ०० दरम्यान भेटून काही मागण्या मांडणार असल्याची माहिती पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली आहे.
या भेटीच्या माध्यमातून हंसराज अहीर पुढील मागण्या जिल्हा प्रशासनासमोर मांडणार आहेत -
⏺चंद्रपूर शासकीय महाविद्यालय महिला रुग्णालयात सेंट्रल ऑक्सिजन सिस्टम, व्हेंटिलेटर, आयसीयू च्या व्यवस्थेसह ४०० बेड उपलब्ध असतांना ते त्वरित सुरु करावे.
⏺डॉक्टर्सची कमी सेवाभावी आयएमए शी चर्चा करून फिजिशियन, MBBS डॉक्टर्सची गरज आहे ती विनंतीवर मागणी करून सहकार्य घ्यावे.
⏺जिल्ह्यातील प्रमुख शहरातील चंद्रपूर महानगरासह खाजगी रुग्णालये बालरोग रुग्णालयासह अधिग्रहित करावे.
⏺वेकोलिचे माजरी, घुग्घुस, बल्लारपूर चे ३ हॉस्पिटल कोविड १९ साठी त्वरित अधिग्रहित करावे.
⏺लालपेठ हॉस्पिटल वेकोलिचे सामान्य रुग्णालयातील एक विभाग शिफ्ट करून त्याजागी कोविड १९ चे बेड वाढवा.
⏺रेमडेसिवीर इंजेक्शन ची कमतरता भासणार नाही अधिक मागणी करून उपलब्ध करून घ्यावे.
⏺जेष्ठ डॉक्टरांसह BAMS / BHMS व अन्य प्रॅक्टिशनर डॉक्टर्सना कोविड १९च्या सेवेकरिता मदत घ्यावी.
⏺होम आयसोलेट परिवार व रुग्णांसाठी खोल्यांची अडचण पाहता मंगल कार्यालये, वसतिगृह, शाळा अन्य अधिग्रहण करून गरीब कुटुंबाना व्यवस्था करून घ्यावी. महानगर पालिकेने यात पुढाकार घ्यावा.
कोविड रुग्णांची होत असलेल्या गैरसोयींमुळे रुग्ण व रुग्णांच्या परिवारांमध्ये प्रचंड रोष निर्माण होण्याचे संकेत दिसत आहे. जिल्ह्यातील हॉस्पिटल व इमारतीच्या उपलब्धतेनुसार खालील बाबींवर त्वरित निर्णय घेत वर्तमान व भविष्यात रुग्णांच्या सेवेकरिता व्यवस्थेत मदत होईल असे पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना पत्राच्या माध्यमातून सुद्धा कळविले आहे.