चंद्रपूर दि. २८ अप्रैल: सौम्य लक्षण असलेल्या कोरोना रुग्णांकरिता गृह विलगीकरण सर्वोत्तम पर्याय आहे. गृह विलगीकरण करण्यात आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असून नवीन रुग्ण देखील मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. गृह विलगीकरणातील या रुग्णांना मोफत सेवा देऊ इच्छिणाऱ्या सेवाभावी डॉक्टरांनी जिल्हा प्रशासनाच्या कंट्रोल रूमला आपली माहिती देऊन नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
तरी इच्छुक वैद्यकीय व्यावसायिकांनी आपली नोंदणी करण्यासाठी कंट्रोल रूमला ०७१७२-२७४१७३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी कळविले आहे.