मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडिया वर संवाद साधला.
महाराष्ट्र राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही प्रमाणात खाली आली आहे. पण आपण अद्यापही कोरोनाच्या नव्या विषाणूवर ताबा मिळवू शकलेलो नाही.
महाराष्ट्र राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. ग्रामीण भागात आता रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणे गरजेचं आहे. त्यामुळे राज्यात कडक लॉकडाऊन नाही मात्र निर्बंध कायम राहणार असल्याची घोषणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
दुसर्या लाटेतला विषाणू झपाट्यानं पसरतोय. त्यामुळे कडक लॉकडाऊन नाही परंतु निर्बंध कायम राहणार आहेत. काही जिल्ह्यांमध्ये प्रादुर्भाव अजूनही वाढत आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
महाराष्ट्र राज्यातील कोरोना परिस्थिती बघता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन आणखी 15 दिवसांसाठी वाढवला आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन हा आता 15 जूनपर्यंत असणार आहे. मे महिन्यात काही जिल्ह्यांमधील परिस्थितीत नियंत्रणात आली तर काही ठिकाणी रुग्णसंख्येत वाढ झाली. त्यानुसार लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येणार आहे. तसेच ज्या भागात रुग्णसंख्या वाढत आहे त्या भागातील निर्बंध आणखी कडक करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.