चंद्रपुर/मूल :आंबे तोडण्यास गेलेल्या मारोडा येथील मनोहर आडकुजी प्रधाने याला वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज दिनांक 23 मई 2021रोजी सकाळी उघड़किस आली. मृतकांचे नाव मनोहर आडकुजी प्रधाने वय (६८) राहणारा मारोडा येथील आदर्श खेड्यात.
रोजगार हमी योजनेच्या कामावर गेलेल्या मुलगा आणि सुनेला जेवनाचा डब्बा देण्यास गेलेल्या मनोहर आडकुजी प्रधाने नहरा लगतच्य झाडाचे आंबे तोडुन घराकडे परत येत असतांना नहरात पाणी पिण्यासाठी आलेल्या वाघाने त्याचेवर हल्ला केल्याने त्याचा घटना स्थळीच मृत्यु झाली. दुपारी १२ वा. पर्यत घरी परत न आल्याने त्याचा शोध घेतला असता मनोहर नहराच्या काठावर मृतावस्थेत दिसला. मृतकाच्या पाय तोडलेला आणि गळा चिरलेला दिसल्याने वाघानेच त्याला ठार केल्याचे निष्पन्न झाले.
सदर घटनेची माहीती वन विभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी जी.आर.नायगमकर, क्षेत्र सहाय्यक पाकेवार, वनरक्षक उईके, पारधे आणि ठाकरे यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतक मनोहर प्रधाने यांच्या कुटूंबियास वन विभागा तर्फे २५ हजार रूपयाची तातडीची मदत देण्यात आली व पुढील तपास शुरू आहे.