#Loktantrakiawaaz
मुंबई, 11 ऑगस्ट : कोरोनाची तिसरी लाट आली तर त्यासाठी राज्य सरकारने तयारी केली आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी एका महत्त्वाच्या निर्णयाची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जी कोरोनाबाधितांची सर्वोच्च आकडेवारी होती, त्याच्या दीडपटीने व्यवस्था करा, अशी सूचना टास्क फोर्सकडून करण्यात आली आहे. त्यानुसार जवळपास 3800 मेट्रिक टनपर्यंत ऑक्सिजनजी गरज भासणार आहे. अशा परिस्थितीत 700 मेट्रिक टन एका दिवसाला ऑक्सिजन तिसऱ्या लाटेत ज्यादिवशी लागेल तेव्हा राज्यात तातडीने लॉकडाऊन ऑटोमोडमध्ये करण्यात येईल, असा निर्णय झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.