अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील : आरोग्यमंत्री राजेश टोपे
#Loktantrakiawaaz
#NightCurfewUpdateNews
जालना, 29 ऑगस्ट : केंद्राने महाराष्ट्र राज्याला रात्रीच्या संचारबंदीची (Maharashtra Night Curfew) शिफारस केल्यानंतर महाराष्ट्र राज्यात अधिक काळजीची गरज असल्याचे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी व्यक्त केलं. केरळमधील ओनम सणाच्या काळात झालेल्या कोरोना प्रादुर्भाव पाहता केंद्राच्या सुचनेची अंमलबाजावणी होईल, मात्र, याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील (CM Udhav Thakrey) , अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे माध्यमांशी बोलताना दिली.
टोपे म्हणाले, केरळ राज्यातील ओनम सणामुळे वाढलेला कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्राने महाराष्ट्र राज्याला रात्रीच्या संचाबंदीची सूचना केलीय. आगामी काळात महाराष्ट्र राज्यातील सणवार पाहता या बाबत काळजी घेण्याची गरज असून केंद्राच्या सूचनेची अंमलबजावणी होईल. मात्र याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय.