Maharashtra Theatres Reopen:नाट्यगृह उघडणार "या" तारीख पासून सुरु करण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले Chief Minister Uddhav Thackeray Has Given Permission To Start Theaters And Natya Gruh

Maharashtra Theatres Reopen:
नाट्यगृह उघडणार "या" तारीख  पासून सुरु करण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले

#Loktantrakiawaaz
#TheatresReopenNews
मुंबई, 03 सेप्टेंबर :महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर हॉटेल, बार, रेस्टॉरंट्स, मॉल्स काही निर्बंधांसह सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, सिनेमागृह आणि नाट्यगृह सुरु करण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आला नव्हता. मात्र, आता 50 टक्क्यांच्या मर्यादेसह 5 नोव्हेंबरपासून नाट्यगृह सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. नाट्यक्षेत्रातील काही मान्यवर कलाकारांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी नाट्यगृह सुरु करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी 5 नोव्हेंबरपासून नाट्यगृहे सुरु करण्यास परवानगी दिली आहे. तसा आदेश संबंधित सगळ्या शासकीय अधिकारी आणि विभागांना ताबडतोब देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत चर्चेसाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष नवनाथ मच्छिन्द्र कांबळी, प्रवक्ते मंगेश कदम, मराठी नाट्यव्यासायिक निर्माता संघाचे अध्यक्ष संतोष भरत काणेकर, रंगमंच कामगार संघटनेचे अध्यक्ष किशोर वेल्ले, विजय केंकरे, रंगकर्मी आंदोलन प्रतिनिधी विजय राणे उपस्थित होते. आदेश बांदेकर आणि सुबोध भावे यांनी ही भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. या सगळ्यांच्या उपस्थितीत नाट्यगृहे सुरु करण्याबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय.

 (Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray Has Given Permission To Start Theaters And Natya Gruh)