ऐतिहासिक व्हीआयपी गेस्टहाउसला संग्रहालय बनवणार, ते बांधकाम तात्काळ पाडण्याच्या आयुक्तांना सूचना, खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले पत्र #ChandrapurHistoricalVipGuestHouse Musium

ऐतिहासिक व्हीआयपी गेस्टहाउसला संग्रहालय बनवणार

ते बांधकाम तात्काळ पाडण्याच्या आयुक्तांना सूचना

खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले पत्र

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर : ब्रिटिशांनी (British) येथे राज्य केले. त्या कार्यकाळात येथे सराई हे व्हीआयपी विश्रमगृह (VIP Rest House) बांधण्यात आले. देशासाठी झटणाऱ्यासोबत मोठमोठ्या व्यक्तीनी येथे काही क्षण घालविले. याच सराईची आता बिकट अवस्था झाली आहे. डागडुजी करून सराईला चांगले करण्याऐवजी मनपाने त्यासमोर लाखो रुपयांचे सौदरीकरण  करून हि ऐतिहासिक इमारतीचे विद्रुपीकरण करण्याचे चुकीचे काम करीत आहे. हे बांधकाम तात्काळ पडण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर (MP Balu Dhanokar) यांनी महानगर आयुक्तांना दिल्या आहे. त्यासोबतच खासदार बाळू धानोरकर यांच्या माध्यमातून चंद्रपूरचे (Chandrapur) पहिले ऐतिहासिक संग्रहालय (First Historical Muslim) याच इमारतीत बनवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. चंद्रपुर ची सराय ही इमारत इतिहासाची साक्ष आहे, चंद्रपुर महात्मा गांधी (Chandrapur Mahatma Gandhi), आलेले असताना ते याच इमारतीत थांबले होते. देशातील इतरही महान व्यक्ती याच इमारतीत थांबले होते. जगात अशा इमारतींच्या संरक्षणाची चर्चा होत असताना आणि त्यासाठी कोटयवधी रुपये खर्च होत असताना सराई इमारत मात्र शेवटच्या घटका मोजत आहे. चंद्रपुरातील विविध संस्था ही इमारत वाचावी यासाठी धडपडत आहेत पण महानगरपालिका (Chandrapur CMC) मात्र यासाठी उदासीन दिसून येते. सराई गेस्टहाऊसला संग्रहालय करण्यासाठी व तिच्या जतनासाठी राज्य शासनाला निधी मागण्यासाठी खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (CM Udhav Thakrey) यांना पत्र लिहिले आहे.  

दोन ऑक्टोबर १९२१ रोजी चंद्रपूरचे तत्कालीन उपयुक्त गोपीनाथ बेउर यांच्या हस्ते सराई गेस्टहाऊसचे उदघाटन करण्यात आले. त्यावेळी या इमारतीचे बांधकामासाठी सरकारी कार्यालय, तत्कालीन प्रतिष्ठित व्यापारी, खाणी व मिल यांच्यासोबतच गोंडराजाचे वारस गोविदशहा बापू, सर हुकूमचंद रामभागत, राजे लक्ष्मणराव भोसले, रणशाह बापू, फकीरशाह बापू, पतृजी खोब्रागडे आदींनी लोकवर्गणी गोळा केली. २३ हजार ५६ रुपयांत या वास्तूचे काम झाले. टी. आर श्रीनिवास या कंत्राटदाराने हि वास्तू उभी केली होती. १९ फ़ेब्रुरवारी १९२७ रोजी या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. त्यावेळचे तत्कालीन गृहमंत्री इ. राघवेंद्रराव यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. हि इमारत 'कोलो नियल पद्धती'ने बनविण्यात अली आहे. ब्रिटिश पद्धतीने बनविण्यात आलेली हि विदर्भातील पहिली इमारत असल्याचे इतिहास अभ्यासकांचे म्हणणे आहे.
 
 सराई या वास्तूचे चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक महत्व व स्थापत्य शैलीचा विचार करता हि वस्तू राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात यावी. त्यासोबतच येथे चंद्रपूर जिल्ह्याच्या ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी निधी देण्याची लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. येथे लवकरच संग्रहालय उभे करण्याची ग्वाही खासदार बाळू धानोरकर यांनी दिली आहे.