खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची उपस्थिती
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे आयोजन
#Loktantrakiawaaz
चंद्रपूर : चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित ऑनलाइन घरगुती गणेश उत्सव (Online Home Ganesh Utsav Decoration) स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी (Father Of Nation Mahatma Gandhi) यांच्या जयंतीचे औचित्य साधून शनिवारी (ता. २ ऑक्टोबर ) सकाळी ११.३० वाजता कस्तुरबा चौकातील चंद्रपूर (Kasturba Chawk, Chandrapur) शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात (Chandrapur City Congress Comitee Office) हा कार्यक्रम पार पडला.
Chandrapur City Congress Online Home Ganesh Decoration Compitation Prize Distribution.
या कार्यक्रमाला खासदार बाळूभाऊ धानोरकर, शहर जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेचे पहिले पारितोषिक कार्तिक नंदुरकर यांना ११ हजार १११ रुपये, भेटवस्तू, प्रमाणपत्र देण्यात आले. दुसरे पारितोषिक एकता पित्तुलवार (७ हजार ७७७ रुपये, भेटवस्तू, प्रमाणपत्र), तिसरे पारितोषिक सुभाष लांजेकर (५ हजार ५५५ रुपये, भेटवस्तू, प्रमाणपत्र), चौथे पारितोषिक प्रणय विटेकर (३ हजार ३३३ रुपये, भेटवस्तू, प्रमाणपत्र), तर, पाचवे पारितोषिक समीर राखुंडे (२ हजार २२२ रुपये, भेटवस्तू, प्रमाणपत्र) देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच प्रज्वल गर्गेलवार, आकाश गुंडावार, मंगेश अलोने, चैतन्य ठाकरे, कोमल चांडक, पवन लोनगाडगे, ऐश्वर्या आक्केवार, रोशनी गहुकार, हर्षाली बोकडे, रामदास आक्केवार, दीपक गौरकर, श्रीधर बुरिले, किशोर माणुसमारे, नितेश ठाकरे, मनोज बल्की, युगंधरा मडपुरवार यांना प्रोत्साहनपर बक्षीसे देण्यात आली.
कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, कामगार नेते के. के. सिंग, महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष सुनीताताई अग्रवाल, महिला काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष चित्राताई डांगे, नगरसेवक प्रशांत दानव, नगरसेविका सकीना अन्सारी, नगरसेवक नीलेश खोब्रागडे, नगरसेविका वीणा खनके, नगरसेविका ललिता रेवल्लीवार, रमीज शेख, सुनील पाटील, अनुसूचित जाती विभागाच्या अनुताई दहेगावकर, शालिनी भगत, सेवादल जिल्हाध्यक्ष स्वाती त्रिवेदी, राजेश अडूर, कुणाल चहारे, पप्पू सिद्दीकी, प्रसन्ना शिरवार, पितांबर कश्यप, बलवीर गुरम, सुरेश गोलेवार, कुणाल रामटेके, राजू वासेकर, धर्मेंद्र तिवारी, राहुल चौधरी, वंदना भागवत, चंदा वैरागडे, शिल्पा आंबटकर, सागर वानखेडे, अंकुश तिवारी, कासिफ अली, एजाज़ भाई, सुनंदा धोबे, राज यादव, बंडोपंत तातावार, प्रकाश देशभ्रतार, सागर वानखेडे, सलमान खान, सूर्य अड़बोले, रिषभ दुपारे, गौस खान, उषा मेश्राम, कल्पना गिरडकर, अजय मोरे, दुशांत लाटेलवार, रवी रेड्डी यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.