जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून तळागाळातील जनतेच्या समस्या सुलभतेने सोडविण्याचा दृष्टिकोण, खासदार बाळू धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्धघाटन, सरपंच व उपसरपंच, सदस्य यांचा सत्कार व कार्यकर्ता मेळावा Mp Balu Dhanorkar

जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून तळागाळातील जनतेच्या समस्या सुलभतेने सोडविण्याचा दृष्टिकोण

खासदार बाळू धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्धघाटन

सरपंच व उपसरपंच, सदस्य यांचा सत्कार व कार्यकर्ता मेळावा

#Loktantrakiawaaz
पांढरकवडा : या भागातील तळागाळातील जनतेच्या समस्या सुलभतेने सोडविण्याच्या दृष्टिकोनातून व त्यांना वेळेवर न्याय मिळावा यासाठी जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला आहे. मी स्वतः या कार्यालयात बसून नागरिकांच्या समस्या ऐकून घेणार असून तातडीने त्यांचा निर्वाळा करण्यात येईल, असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर (MP Balu Dhanorkar) यांनी केले. ते पांढरकवडा (Pandharkawada) येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्धघाटन कार्यक्रम, सरपंच व उपसरपंच, सदस्य यांचा सत्कार व कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी ३२ महिला, पुरुष सरपंच  व ३९ महिला, पुरुष उपसरपंच यावेळी महिलांना साडी व पुरुषांना सफारी तसेच २०० ग्रामपंचायत सदस्यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश झाला.

यावेळी माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके, माजी आमदार वामनराव कासावार, अध्यक्ष यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक (Yavatmal District Co-Op Bank) टीकाराम कोंगरे, जिल्हा परिषद सदस्य सतीश वारजूरकर, नगराध्यक्ष नगर परिषद पांढरकवडा वैशाली नाहाते,तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष केळापूर अमर पाटील, शहर काँग्रेस अध्यक्ष पांढरकवडा मनोज भोयर, जितेंद्र मोघे, विजय पाटील, चकवर्डीकर, शंकर अण्णा, नालमवार, वामनराव सिडाम, आशिष कुलसंगे, मनू रोडे, संतोष बोरले, प्रकाश कासावार, श्रीहरी कट्टेवार, राजू एलटीवार, प्रमोद राठोड, बिलास सिंदो, बापू धोटे, रिजवान शेख, व्यंकटेश सामावार, काशिनाथ शिंदे, अक्रम अली यांची उपस्थिती होती.  
यावेळी माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके म्हणाले कि, काँग्रेसचे महाराष्ट्रातील (Maharashtra's Congress MP Balu Dhanorkar) खासदार बाळू धानोरकर हे एकमेव खासदार आहेत. त्यांच्या लोकांमध्ये राहून समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्याविषयीची तळमळ त्यातून त्यांच्यात लोकनेता मला दिसतो. या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम केले जाणार आहे. सरकारच्या विविध योजना या कार्यालयाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचवला जाणार असून याचा लाभ जनतेला दिला जाणार आहे. त्यामुळे हे कार्यालय विकासाचे केंद्र बिंदु ठरेल असे काम या कार्यालयाच्या माध्यमातून होणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

 यावेळी माजी आमदार वामनराव कासावार म्हणाले की महा विकास आघाडी (Mahavikas Aghadi Government) सरकार हे समाजातील शेवटच्या घटकाला केंद्रबिंदू म्हणून त्याच्या सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने योजना आखत आहे.  येत्या काळात काँग्रेस मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद व पंचायत समिती काबीज करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी  जिल्हा परिषद सदस्य सतीश वारजूरकर यांनी आपले मत मांडले, यावेळी त्यांनी जिल्हा परिषद व ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या अनेक योजना सांगितल्या. यावेळी लोकप्रतिनिधी यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी करावयाच्या नियोजनाची देखील त्यांनी यावेळी माहिती दिली. यावेळी अन्य मान्यवर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.