वरोरा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन
#Loktantrakiawaaz
#Warora-News
वरोरा, 21 ऑक्टोबर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (Rashtra Sant Tukadoji Maharaj) यांच्या ५३ व्या पुण्य स्मरण सोहळया निमिता ने अ.भा.श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रमाचे (Akhil Bhartiya Shri Gurudeo Seva Mandal Gurukunj Ashram) वतीने सर्व गुरुदेव सेवा मंडंळाना सुचित करुन कोरोना (Corona) परिस्थिती लक्षात घेता यावर्षीही मागील वर्षी प्रमाणे च पुण्यतिथी साजरी होत आहे त्यामुळे उपासकांनी मोझरीला (Mojhari) न येता आप आपल्या मंडळात गावीच हा सोहळा साजरा करावा आणि. या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन (Blood Donation Camp) करुन या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे असे कळविले त्या अन्वये वरोरा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराची सुरुवात दिप प्रज्वलन व संकल्प गीताने झाली. रक्तदान शिबिराचे उदघाटन डॉ राठोड अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय वरोरा (Up Jilha Hospital Warora) यांचे हस्ते अहतेशाम अली नगराध्यक्ष वरोरा यांचे अध्यक्षतेखाली (Warora Nagar Parishad President Ahtesham Ali) व लक्ष्मणराव गमे उपसर्वाधिकारी अ.भा श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम , छोटुभाई शेख सभापती न.प.वरोरा, डॉ शेन्डे, चंदनलालजी शर्मा, जीवनप्रचारक, लक्ष्मण कातोरे , यांचे प्रमुख उपस्थितीत श्री गुरुदेव सेवा मंडळ आश्रम वरोरा येथे दि २१/१०/२०२१ ला पार पडले. शासकीय जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथील डॉक्टर व त्यांची चमु संजय गावीत, उत्तम सावंत, रोषण भोयर, मनोज घोळके, चेतन वैरागडे यांनी रक्त दानाची व्यवस्था केली. या प्रसंगी नगराध्यक्ष-अहेतेशाम अली यांनी आजचा परिस्थितित रक्ताची किती गरज आहे हे पटवून दिले व गुरुदेव सेवा मंडळातिल सर्व सदस्यांचे रक्तदान शिबिर (Blood Donation Camp) घेतल्याबद्दल खुप खुप आभार मानले आणि सर्व रक्तदात्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रा रुपलाल कावळे, लक्ष्मणराव गमे, नंदकिशोर खिरटकर, अविनाश पिंपळकरसर, मनोहरराव पारोधेसर, अशोकराव वैद्यसर मुख्याध्यापक, चंदशेखर कानकाटेसर, अशोकराव ठेंगे मध्यवर्ती प्रतिनिधी , धनंजयराव कोहाडेसाहेब, झुरपुडे, कादर शेख पुंडलीक राव कवरासे साहैब, दानविर वैरागी आंबोरकर तसेच गुरुदेव सेवामंडळाचे सर्व उपासकांनी याकरिता ता अथक परीश्रम घेतले. या कार्यानिमित्ताने जयंतराव पहापळे प्रतिक्षा नगर मुंबई यांचे कडुन रक्तदान करणाऱ्यांना तसेच सर्व मान्यवरांना त्यांच्या सौभाग्यवती स्व.सुहासिनी पहापळे यांचे स्मृती प्रित्यर्थ ग्रामगीता भेट देणयात आली. तसेच त्यांचेकडून ५०० ग्रामगीता भेटस्वरुपात जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी देण्यात आले. यासर्व कार्यक्रमाचे संचालन प्रा रुपलाल कावळे चंद्रपूर जिल्हासेवाधिकारी यांनी केले आभार प्रदर्शन अशोकराव ठेंगे यांनी केले.