Today 04 OCTOBER: चंद्रपुर जिल्हा कोरोना अपडेट Chandrapur Corona Update

Today 04 OCTOBER: चंद्रपुर जिल्हा कोरोना अपडेट 

✳️ 02 कोरोना वर मात 

✳️ 01 नविन पॉझिटिव्ह 

✳️ 00 बाधितन्चा कोरोना ने मृत्यू

 #LokTantra_Ki Awaaz #ChandrapurCoronaNews

चंद्रपूर, दि. 4 ऑक्टोंबर : गत 24 तासात जिल्ह्यात 2 जणांनी कोरोनावर मात (Covid-19) केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 1 जण नव्याने पॉझिटीव्ह (Today New Covid-19 Positive) आले आहेत. चंद्रपुर जिल्ह्यात (Chandrapur District) सोमवारी एकाही बाधिताचा  मृत्यू  झाला नाही.

आरोग्य विभागाच्या (Health Department) प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 1 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील (Chandrapur CMC) 1, चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर 0, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, नागभीड 0, सिंदेवाही 0, मुल 0, सावली 0, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 0, राजूरा 0, चिमूर 0, वरोरा 0, कोरपना 0, जिवती 0 व इतर  ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.

चंद्रपुर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 753 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 171 झाली आहे. सध्या 41 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 5 हजार 106 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6 लाख 14 हजार 872  नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1541 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.