#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, ता. १ नवंबर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकास्तरावर काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकाना माहे मार्च ते जून २०२१ पर्यंतचा थकीत मासिक ४०००/- रुपये प्रोत्साहनपर भत्ता मनपाच्या पुढाकारातून अदा करण्यात आला आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला आशा स्वयंसेविकांना थकीत रक्कम मिळाल्याने आनंद व्यक्त होत आहे.
Chandrapur Muncipal Corporation
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियाना अंतर्गत महानगरपालिका भागात आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी जनता व आरोग्य केंद्र यांच्यामध्ये आशा स्वयंसेविका या दुवा म्हणून काम करतात. त्यांना कोणताही प्रतिमाह मानधन निश्चित नसून, शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे केलेल्या कामानुसार मोबदला देण्यात येतो. कोविड (Covid-19) अंतर्गत राज्य शासनामार्फत प्रति आशा स्वयंसेविका २ हजार रुपये प्रमाणे एप्रिल ते ऑगस्ट २०२१ या ५ महिन्याकरिता अतिरिक्त मोबदला मंजूर करण्यात आला आहे. २२ ऑक्टोबर २०२१ नुसार १२४ आशांना मनपाने १२ लाख ८० हजार रुपये मंजूर केले. त्याची रक्कम २९ ऑक्टोबर २०२१ ला अदा करण्यात आली. तसेच एप्रिल ते सप्टेंबर २०२१ या ६ महिन्याचे कोविड मोबदला म्हणून मनपामार्फत प्रति आशा स्वयंसेविका, प्रतिमाह रुपये १ हजार प्रमाणे अदा करण्यात आले आहेत.
आयटक संलग्नित महाराष्ट्र राज्य आशा वर्कर व गटप्रवर्तक संघटनेच्या नेतृत्वात चंद्रपूर शहरातील आशा स्वयंसेविकानी वाढीव ४ हजार रुपये भत्ता देण्यात यावा, या मागणीसाठी २६/१०/२०२१ पासून मुक्कामी ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांनी तत्काळ दखल घेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी कार्यालय (Chandrapur Collector Office) चंद्रपूर यांचे कार्यालयीन तांत्रीक मान्यता आदेश दिनांक ३०/१०/२०२१ अन्वये जिल्हा खनिज प्रतिष्ठान, चंद्रपूर फंडातून चंद्रपूर महानगरपालिकेला कोविड अंतर्गत उपाययोजनाकरीता निधी मंजूर करवून घेतले. सदर मंजुर निधीमध्ये चंद्रपूर महानगरपालिका अंतर्गत आशा स्वयंसेविका यांना माहे मार्च २०२१ ते जुन २०२१ या चार महिण्याचे प्रती महा रु. ४,००० /- प्रमाणे जिल्हा खनिज प्रतिष्ठान, चंद्रपूरमधून मानधन अदा करण्याकरीता निधी मंजूर करण्यात आलेला आहे. मनपा प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन दिवाळीच्या पूर्वसंध्येला आशा स्वयंसेविकांना मानधन अदा केल्याने आनंद व्यक्त होत आहे. दरम्यान, महानगरपालिकेने डेंगू सर्व्हेसाठी कामाचा मोबदला रुपये २५०० प्रति आशा स्वयंसेविकांना मंजूर करून, तोदेखील अदा करण्यात आला.