संविधान दिना निमित्त आरोग्य शिबिर व रोगनिदान शिबिर उत्साहात संपन्न ChandrapurHealth Checkup Camp

संविधान दिना निमित्त आरोग्य शिबिर व रोगनिदान शिबिर उत्साहात संपन्न

#Loktantrakiawaaz News
चंद्रपुर, 23 नवंबर : संविधान दिनाचं औचित्य साधून चंद्रपुरातील दादमहाल वॉर्ड शालवन बुद्ध विहाराच्या प्रगणात मोफत आरोग्य शिबिर चे आयोजन करण्यात आले होते. 
(Chandrapur Health Checkup Camp)

चंद्रपूर शहरातील डॉ. साहस बेडले, डॉ सुनिल मल्लोजवार, डॉ ललित तामगाडगे, डॉ रितेश सोनडवले, डॉ प्रीती उराडे, डॉ सुवर्णा सोडवले, डॉ तुषार भागवत, डॉ स्नेहा एस. बेदले  व सहकारी मिञ मंडळ उपस्थित होते.

चंद्रपूर शहरातील विविध भागातून येऊन नागरिकांनी आरोग्य तपासणी करुन घेतली व त्यावरील लागणारी औषधीचे मोफात वाटप करण्यात आले . शहरातिल वृद्ध, महिला, बालक, व  आदी नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित होते. चंद्रपूर शहरातील 374 नागरिकांनी आरोग्य तपासणी करुन घेतली.

कार्यक्रमाचे उद्घाटक  वैद्यकीय अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ बंडू रामटेके उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून गणेश येरणे, नारायण फार्मा, चंद्रपूर यांची उपस्थिती होती.
तर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष संदिप सुरेश देव , उपाध्यक्ष चंद्रगुप्त कातकर, तर सचिव स्वप्नील देव , सहसचिव पंकज चांदेकर, कोषाध्यक्ष शुभम चांदेकर तर सदस्य म्हणून अमान दुर्गे व यशोदिप मेश्राम यांची उपस्थिती होती.