कृषी कायदे रद्दच्या निर्णयाचे स्वागत, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने फटाके फोडून आनंदोत्सव Farmer Bill Chandrapur City District Congress Comitee

▶️ कृषी कायदे रद्दच्या निर्णयाचे स्वागत

▶️ चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने फटाके फोडून आनंदोत्सव

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, 19 नवंबर : केंद्र सरकारने (Central Government) संसदेत मंजूर केलेला तीन्ही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी देशातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात शेकडो शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. अखेर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा आज केली. या निर्णयाचे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी (ता. १९ नवंबर) दुपारी १ वाजता येथील कस्तुरबा चौकात फटाके फोडून स्वागत करण्यात आले. 

कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने करून बघितला. मात्र, आंदोलक  शेतकरी हटले  नाहीत. या शेतकऱ्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष ताकदीने उभा राहिला. त्यामुळॆच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला, हे आंदोलक शेतकऱ्यांचे यश असल्याची भावना चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी व्यक्त केली.  
(Chandrapur City District Congress Comitee)
(Farmer Bills)

यावेळी कामगार नेते के. के. सिंग, नगरसेविका वीणा खनके, नगरसेविका सकीना अन्सारी, नगरसेवक नीलेश खोब्रागडे, नगरसेवक नंदू नागरकर, अनुताई दहेगावकर, शालिनी भगत, गोपाल अमृतकर, अश्विनीताई खोब्रागडे, संजय रत्नपारखी, सुनील पाटील, प्रवीण पडवेकर, मलक शाकीर, नरेंद्र बोबडे, इरफान बाबा शेख, कुणाल चहारे, सुरेश दूर्सेलवार, नासीर खान,  राज यादव, पप्पू सिद्दीकी, राजू वासेकर, भालचंद्र दानव, राजेंद्र वर्मा, वंदना भागवत,  शालिनी भगत, गौस खान पठाण,  पितांबर कश्यप, प्रसन्ना शिरवार, इरफान शेख, राहुल चौधरी, मनीष तिवारी, कासिफ अली, केतन दुरसेलवार यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

केंद्रातील हिटलर सरकारला उशिरा शहाणपण सुचले. कृषी कायदे रद्दचा आधीच निर्णय झाला असता, तर शेकडो शेतकऱ्यांचे जीव गेले नसते. तरीदेखील कृषी कायदे रद्दच्या निर्णयाचे स्वागत करतो.
 - रितेश (रामू) तिवारी,
जिल्हाध्यक्ष 
 चंद्रपुर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, चंद्रपूर