#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, ता. ८ डिसम्बर : सध्या हिवाळ्यामुळे थंडी (Winter Session) वाढली असून, उघड्यावर राहणाऱ्या बेघर बांधवांची गैरसोय होऊ नये, थंडीपासून संरक्षण व्हावे, यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या (Chandrapur City Municipal Coaporation) माध्यमातून दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानअंतर्गत रात्रीच्या सुमारास बेघर बांधवांना मनपाच्या (CMC) बेघर निवारा गृहात आणण्यात येऊन त्यांची व्यवस्था करण्यात येत आहे.(Homeless brothers and sisters who are struggling in the cold get shelter of Chandrapur Municipal Corporation)
महाराष्ट्रामध्ये हिवाळ्यात थंडीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरी बेघरांना थंडीपासून संरक्षण उपलब्ध करून देण्यात यावे, यासाठी नागरी भागातील बेघरांना निवारा सुरू करण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी रात्री सर्वेक्षण करून बेघरांना निवाऱ्यामध्ये आणण्यात येते. रात्रीच्यावेळी कोणी रस्त्यावर, उड्डाणपुलाखाली, रेल्वेस्टेशन(Railway Station), बसस्थानकात (Bus Stand) झोपू नये यासाठी महापालिकेने बेघर निवारा केंद्र सुरू केले आहेत. असे असले तरी अनेक जण या केंद्रात येत नाहीत. त्यामुळे मनपा राष्ट्रीय नागरी उपजीविका कर्मचाऱ्यांनी रात्री बसस्थानक, रेल्वेस्टेशन, उड्डाणपुलांखाली बेघरांचा शोध घेतला. त्यात आढळून आलेल्याना बेघर निवारा केंद्रात दाखल करण्यात आले.
नागरी बेघरांना थंडीपासून संरक्षण मिळावे म्हणुन मनपा प्रशासनातर्फे ही मोहीम सातत्याने राबविण्यात येत असुन याअंतर्गत महाकाली मंदिर, शनी मंदिर, मशीद ग्राउंड दर्गा व फूटपाथवरील बेघर लाभार्थ्यांना नगिनाबाग येथील सरदार पटेल शाळेतील बेघर निवाऱ्यामध्ये आणण्यात आले. येथे एकुण १२ बेघर लाभार्थी सध्या निवाऱ्यामध्ये वास्तव्यास आहे.