पी.यु.सी. केंद्रधारकांनी पी.यु.सी. प्रमाणपत्र शुल्काचे फलक केंद्राच्या दर्शनी भागात लावावे - चंद्रपुर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे #PUC. #PUCCenterHolders #PUCCertificateFeeRATEBoards #ChandrapurSub-RegionalTransportOfficer #KiranMore #RTO

पी.यु.सी. केंद्रधारकांनी पी.यु.सी. प्रमाणपत्र शुल्काचे फलक केंद्राच्या दर्शनी भागात लावावे - चंद्रपुर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी  किरण मोरे

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, दि. 15 डिसेंबर : परिवहन आयुक्त, मुंबई यांच्या सूचनेनुसार चंद्रपुर जिल्ह्यातील सर्व पी.यु.सी. (Chandrapur District PUC Centre) केंद्र धारकांनी त्यांच्या केंद्रावर वाहन तपासणीकरिता आल्यास त्यांना देण्यात येणाऱ्या पी.यु.सी. प्रमाणपत्र शुल्काचे (PUC CERTIFICATE RATE BOARD) फलक (रेट बोर्ड) हे पीयूसी केंद्राच्या मुख्य दर्शनी भागावर ग्राहकांना दिसेल अशा ठिकाणी लावण्याबाबत सूचित केले आहे. (RTO, Chandrapur)

(P.U.C.  Center Holders  Certificate Fee RATE Boards should be placed in the front of the center - Chandrapur Sub-Regional Transport Officer Kiran More)

👉🏻 वाहन प्रकारानुसार त्याचे दर निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये 

➡️ दुचाकी वाहन- 35 रु.,    

➡️ पेट्रोलवरील तीन चाकी वाहन-70 रु.,       
                   
➡️ पेट्रोल, सीएनजी, एलपीजीवर चालणारी चारचाकी वाहने-90 रु.     

➡️ डिझेलवर चालणाऱ्या वाहनांकरिता 110 रुपये 
दर निश्चित करण्यात आले आहे.

त्याअनुषंगाने पी.यु.सी. केंद्रधारकांनी आपल्या पी.यु.सी. केंद्रावर प्रमाणपत्र दराचे फलक ठळक अक्षरात लावावे, दराचे फलक ठळक अक्षरात लावल्यास ग्राहकांना योग्य दराची माहिती मिळून संभ्रम दूर होण्यास मदत होईल.

तरी, चंद्रपुर जिल्ह्यातील पी.यु.सी. केंद्र धारकांनी न चुकता आपल्या केंद्रावर दर फलक लावावे व त्या कार्यवाहीचा अहवाल चंद्रपुर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयास सादर करावा. असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे (Chandrapur Dy RTO Kiran More) यांनी कळविले आहे.