तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ नियंत्रण कायदा भरारी पथकाद्वारेचंद्रपुर महानगरतील 34 पान टपरीवाल्यांवर कारवाई Chandrapur Tobacco and Tobacco Control

तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ नियंत्रण कायदा भरारी पथकाद्वारे

चंद्रपुर महानगरतील 34 पान टपरीवाल्यांवर कारवाई

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, दि. 13 जानेवारी  :  राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तंबाखू नियंत्रण भरारी पथकामार्फत कोटपा कायदा - 2003 ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या चंद्रपुर शहरातील (chandrapur city) 34 पान टपरीवाल्यावंर कारवाई करण्यात आली. यात जटपुरा गेट, रामनगर, वरोरा नाका, जनता महाविद्यालय परिसर येथील 22 पानटपरीधारकांना प्रत्येकी 200 रुपये तर उर्वरीत 12 पानटपरीधारकांना प्रत्येकी 400 रुपये याप्रमाणे दंड आकारण्यात आला.
(Tobacco and Tobacco Control)
सार्वजनिक ठिकाणी, महाविद्यालय, हॉस्पिटल, शाळा परिसरात असलेल्या पानठेल्यावर आरोग्य विभाग, अन्न  व औषध प्रशासन विभाग, पोलिस विभाग यांच्यामार्फत कारवाई करण्यात आली. जास्तीत जास्त लोकांना तंबाखूच्या दुष्परिणामाची जाणीव होऊन नवीन पिढी तंबाखूच्या आहारी जाणार नाही, हा या कारवाईचा मुख्य उद्देश आहे.       
(Department of Health, Department of Food and Drug Administration, Department of Police)

भरारी पथकामध्ये जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा सल्लागार डॉ. श्वेता सावलीकर, अन्न निरीक्षक श्री. सातकर, पोलिस निरीक्षक श्री. मूळे, पोलीस उपनिरीक्षक श्री.दराडे, रामनगर पोलिस स्टेशन व त्यांची चमू तसेच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत येणारे समुपदेशक मित्रंजय निरंजने, तुषार रायपुरे, अतुल शेंद्ररे, यांनी मोलाची कामगिरी केली.