लता मंगेशकर यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट करण्यात आले
#Loktantrakiawaaz
मुंबई, 22 जानेवारी :भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती (Big News) समोर आली आहे. लता दीदी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यापासून अनेक अफवा पसरवल्या जात होत्या. आता यासगळ्यावर महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
लता मंगेशकर यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट करण्यात आले आहे. ज्यात त्रासदायक सट्टा थांबवण्याची विनंती करण्यात आली आहे.
डॉ प्रतित समदानी, यांनी ब्रीच कँडी हॉस्पिटलकडून अपडेट दिले आहेत. लता दीदी यांच्यामध्ये सुधारणेची सकारात्मक चिन्हे दिसत असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये (ICU) उपचार सुरू आहेत.
आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत आणि त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी आणि घरी परतण्यासाठी प्रार्थना (Pray) करत आहोत. असं ट्विटमध्ये लिहिण्यात आलं आहे.
अद्याप भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर अजूनही आयसीयूमध्ये (ICU) उपचार सुरु आहेत. लता दीदींना कोरोना आणि न्यूमोनियामुळे ब्रीच कँडी (Brij Candy Hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांचे हेल्थ अपडेट देखील अनेकदा शेअर केलं आहे.