महिला शिक्षकांची शाल व श्रीफळ देऊन केले स्वागत
#Loktantrakiawaaz
चंद्रपुर, 04 जानेवारी : चंद्रपूर जिल्हा महिला जैन प्रकोष्ठ तर्फे इंडस्ट्रियल इस्टेट वार्डमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी भाजपा जैन प्रकोष्ठ महिला विदर्भ प्रमुख सपना कटारिया भाजपचे ज्येष्ठ नेत्या निता सिंघवी, महिला जिल्हाप्रमुख अर्चना मुनोत, शहर प्रमुख वंदना गोलेछा, विदर्भ सहप्रमुख दर्शना मोदी, विदर्भ कार्यकारणी सदस्य राजश्री मुथा, राजश्री बैद, जयमाला सिंघवी, अनिता गांधी, पायल लोढा, पूनम सिंघवी, यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. Savitribai Fule Jayanti
(BJP).
देशातल्या पहिल्या शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची आठवण करून ज्येष्ठ निवृत्त शिक्षिका विमल तातेड, अनिता डहाले व शिक्षिका शिल्पा कांष्टीया यांचे शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आले.
(Bhartiya Janta Party Jain).
अध्यक्षीय भाषणात सपना कटारिया यांनी सावित्रीबाई फुले यांनी समाजाशी लढत मोठ्या जिद्दीने आपले शिक्षण कसे पूर्ण केले व महिलांसाठी स्वतः शाळा उघडून त्यांना शिक्षण देण्याचे कार्य सुरू केले. त्यांच्यामुळेच आज भारतातील महिला सर्व क्षेत्रात आपले योगदान देत आहे. तसेच आपणही सर्व महिला आपापल्या क्षेत्रात त्यांच्या प्रेरणेने आपले कार्य करावे व देशाची, समाजाची, सेवा करावी असे सुचवले.
(Savitribai Fule Birth Anniversary).
कार्यक्रमाचे संचालन राजश्री बैद, तर आभार प्रदर्शन अर्चना मुणोत यांनी केले.