#Loktantrakiawaaz
चंद्रपुर: चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे नवे आयुक्त म्हणून श्री. विपीन पालीवाल (मुद्दा) यांच्या नियुक्तीचे आदेश सोमवारी, (ता. ३ जानेवारी) नगर विकास मंत्रालयाने जारी केले.
CMC , Chandrapur
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 36 नुसार आयुक्त, चंद्रपूर महानगरपालिका या पदावर श्री. विपिन पालीवाल (मुद्दा) (मुख्याधिकारी गट-अ निवड श्रेणी) यांची प्रशासकीय कारणास्तव नेमणूक करण्यात येत आहे, असे उपसचिव प्रियांका कुलकर्णी- छापवाले यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.
श्री. विपीन पालीवाल (मुद्दा) हे २३ जून २०२१ पासून चंद्रपूर मनपात अतिरिक्त आयुक्त या पदावर कार्यरत होते. त्यांनी आतापर्यंत कामठी, बल्लारपूर आणि वर्धा नगर परिषद येथे मुख्याधिकारी म्हणून काम केले आहे.