आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांनी मंजूर ८.५० कोटी रू. किंमतीच्‍या विकासकामांचे भूमीपूजन १६ फेब्रुवारी रोजी 8.50 crore sanctioned through the efforts of MLA Sudhir Mungantiwar. Bhumipujan development works on 16th February

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांनी मंजूर ८.५० कोटी रू. किंमतीच्‍या विकासकामांचे भूमीपूजन १६ फेब्रुवारी रोजी

#Loktantrakiawaaz
चंद्रपुर, 10 फरवरी: विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने मंजुर झालेल्‍या मुल शहरातील ८.५० कोटी रू. किंमतीच्‍या विकासकामाचा भूमीपूजन सोहळा दिनांक १६ फेब्रुवारी २०२२ रोजी संपन्‍न होणार आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुल शहरातील नागरिकांना विकासकामांसंदर्भात दिलेल्‍या वचनांची पुर्तता या निमीत्‍ताने होत आहे. हा वचनपुर्तीचा सोहळा १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.०० ते सायं. ६.०० वाजता दरम्‍यान संपन्‍न होणार आहे.

 आ. मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने मंजूर ८.५० कोटी रू. किंमतीच्‍या या विकासकामांमध्‍ये प्रभाग क्र. ७, प्रभाग क्र. ८ व अन्‍य प्रभागांमधील सिमेंटकॉंक्रीट रस्‍ते, खडीकरण रस्‍ते, सिमेंट नाली बांधकाम, सिमेंटकॉंक्रीट पाईप नाली, पेव्‍हर ब्‍लॉक आदी कामांचा समावेश आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुल शहरात विकासाची अभूतपूर्व कामे पूर्णत्‍वास आणली आहे. या विकासकामांच्‍या दिर्घ मालिकेत प्रामुख्‍याने मुख्‍यमंत्री कर्मवीर मा. सा. कन्‍नमवार स्‍मृती सांस्कृतीक सभागृहाचे बांधकाम, प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, आदिवासी मुलांचे व मुलींचे शासकीय वसतीगृहांचे बांधकाम, बसस्‍थानकाचे आधुनिकीकरण व नुतनीकरणाचे काम, माळी समाजाच्‍या विद्यार्थ्‍यांसाठी स्‍वतंत्र वसतीगृहाचे बांधकाम, डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय इमारतीचे बांधकाम, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेत अतिरिक्‍त कार्यशाळेचे बांधकाम, इको पार्कचे बांधकाम,  क्रिडा संकुलचे बांधकाम, जलतरण तलावाचे बांधकाम, पाणी पुरवठा योजना, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेत अतिरिक्‍त कार्यशाळेचे बांधकाम, मुल शहरातील मुख्‍य मार्गाचे सिमेंटीकरण तसेच अंतर्गत रस्त्यांचे सिमेंटीकरण, मुल शहरातील वळण मार्गाचे बांधकाम, योगा भवनाचे बांधकाम, वळण मार्गाचे बांधकाम, मुल शहरातील आठवडी बाजार बांधकाम, पत्रकार भवनाचे बांधकाम, पंचायत समितीचे बांधकाम, भूमीगत विद्युत वाहिनीचे बांधकाम विश्रामगृहाचे बांधकाम, स्‍मशानभूमी बांधकाम, 24 तास पाणी पुरवठा करणारी पाणी पुरवठा योजना, मुल शहरात १३ चौकात २४ सिसी सर्व्‍हेलन्‍स सिस्‍टीम,  या विकासकामांचा समावेश आहे.

आ. मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने मंजूर या विकासकामांच्‍या भूमीपूजन सोहळयाला मुल शहरातील नागरिकांनी मोठया संख्‍येने उपस्थित राहण्‍याचे आवाहन नगराध्‍यक्षा सौ. रत्‍नमाला भोयर, उपाध्‍यक्ष नंदू रणदिवे, भाजपा शहर अध्‍यक्ष प्रभाकर भोयर, नगरसेवक मिलींद खोब्रागडे, अनिल साखरकर, सौ. शांता मांदाडे, प्रशांत समर्थ, सौ. वनमाला कोडापे, सौ. विद्या बोबाटे, सौ. रेखा येरणे, सौ. आशा गुप्‍ता, प्रशांत लाडवे, सौ. संगीता वाळके, सौ. वंदना वाकडे, महेंद्र करकाडे, विनोद  सिडाम, सौ. प्रभा चौथाले, सौ. मनिषा गांडलेवार, चंद्रकांत आष्‍टनकर, अजय गोगुलवार यांनी केले आहे.
8.50 crore sanctioned through the efforts of MLA Sudhir Mungantiwar.  Bhumipujan development works on 16th February