▶️ चंद्रपूर मेडीकल कॉलेजचे बांधकाम एचएससीसी च्या माध्यमातुन जलदगतीने पूर्ण करावे - आ. सुधीर मुनगंटीवार
▶️ नवी दिल्लीत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांची भेट.
▶️ सकारात्मक कार्यवाहीचे मनसुख मांडवीया यांचे आश्वासन
#Loktantrakiawaaz
नवी दिल्ली: चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम एचएससीसीच्या माध्यमातुन जलदगतीने पूर्ण करावे, यासंदर्भात भारत सरकारच्या आरोग्य विभागाने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणीवजा विनंती विधीमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांच्याकडे केली. यासंदर्भात एचएससीसी ला त्वरीत सुचना देण्यात येतील, आपण स्वतः याकडे जातीने लक्ष देवू असे आश्वासन केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी दिले.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आज २३ फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांची भेट घेतली व विस्तृत चर्चा केली. आपण अर्थमंत्री असताना शासकीय वैद्यकिय महाविद्यालय चंद्रपूर कार्यान्वीत करत इमारतीच्या बांधकामाला सुरूवात केली. या महाविद्यालयाशी संबंधित एकुणच कामकाजातील अडचणी आपण दुर करविल्या. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या एचएससीसी लिमी. अर्थात हॉस्पीटल सर्विसेस कन्स्लटन्सी कार्पोरेशन लिमी. या कंपनीच्या माध्यमातुन या महाविद्यालयाचे बांधकाम सुरू करण्यात आले. ते बांधकाम अतिशय मंदगतीने सुरू आहे. याचा विपरीत परिणाम वैद्यकिय शिक्षणावर तसेच आरोग्य सेवेवर होत असल्याची बाब आ. मुनगंटीवार यांनी आरोग्य मंत्र्यांच्या निदर्शनास आणली. आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी याबाबत त्वरीत एचएसएससी ला निर्देश देण्याबाबत आ. मुनगंटीवार यांना आश्वस्त केले.
चंद्रपूर जिल्हयात उत्तम आरोग्य सेवा नागरिकांना उपलब्ध व्हावी यासंदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने कॅन्सर हॉस्पीटल उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. शासकीय वैद्यकिय महाविद्यालय कार्यान्वीत करण्यात आले आहे. त्यांच्या अर्थमंत्री पदाच्या कार्यकाळात चंद्रपूर जिल्हयात १४ नविन प्राथमिक केंद्रांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. पोंभुर्णा येथे अद्यावत व सर्व सोयींनी सुसज्ज अशा ग्रामीण रूग्णालयाचे बांधकाम करण्यात आले. खनिज विकास निधीच्या माध्यमातुन आदिवासी बहुल भागातील भंगाराम तळोधी, नांदा, जिवती आणि राजोली या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बांधकाम, बल्लारपूर येथे ग्रामीण रूग्णालय, ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र, वसतीगृह व मेसचे बांधकाम, मानोरा येथे विशेष बाब या सदराखाली प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम, बल्लारपूर तालुक्यातील कळमना येथे प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे बांधकाम, पोंभुर्णा तालुक्यातील उमरी पोतदार येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पागतच्या आदिवासी बहुल गावांमध्ये फिरते रूग्णालय उपलब्ध, चंद्रपूर जिल्हयात पहिल्यांदाच रेल्वेमार्फत लाईफलाईन एक्सप्रेसच्यसा माध्यमातुन रूग्णसेवा अशी विविध कामे आरोग्य क्षेत्रात आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने करण्यात आली आहेत.
त्यांच्या पुढाकाराने शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाचे बांधकाम एचएससीसीच्या माध्यमातुन जलदगतीने पूर्ण होण्याचा मार्ग सुकर व सुलभ झाला आहे.
Construction of Chandrapur Medical College should be completed expeditiously through HSCC. MLA Sudhir Mungantiwar meets Union Health Minister Mansukh Mandvia in New Delhi