Today 01 FEBRUARY: चंद्रपुर जिल्हा कोरोना अपडेट Chandrapur Corona

Today 01 FEBRUARY: चंद्रपुर जिल्हा कोरोना अपडेट

✳️ 307 कोरोना वर मात

✳️ 189 नवीन पॉजिटिव

✳️ 00 बाधितन्चा कोरोना ने मृत्यु

#Loktantrakiawaaz
#Chandrapur-Corona-News

चंद्रपूर, दि. 1 फेब्रुवारी : जिल्ह्यात गत 24 तासात 307 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 189 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. जिल्ह्यात मंगळवारी मृत्यू संख्या शून्य आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 43, चंद्रपूर 13, बल्लारपूर 7, भद्रावती 5, ब्रह्मपुरी 23, नागभीड 16, सिंदेवाही 4, मुल 14, सावली 9, पोंभूर्णा 19, राजुरा 5, चिमूर 19, वरोरा 3,कोरपना 7 तर जिवती येथे 2 रुग्ण आढळून आले असून गोंडपिपरी व  इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.

चंद्रपुर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 97 हजार 658  वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 93 हजार 598 झाली आहे. सध्या 2509 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 45 हजार 979 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 46 हजार 625 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1551 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.