दोन वर्षानंतर साजरी होणार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, राज्यशासनाच्या वतीने 14 एप्रिल बाबतच्या मार्गदर्शक सूचना येत्या चार दिवसात Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar's birth anniversary to be celebrated after two years.

दोन वर्षानंतर साजरी होणार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती

राज्यशासनाच्या वतीने 14 एप्रिल बाबतच्या मार्गदर्शक सूचना येत्या चार दिवसात

#Loktantrakiawaaz
मुंबई, 29 मार्च: भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची जयंती यंदा कोरोनाचे सावट कमी झाले आहे. त्यामुळे आरोग्याच्या नियमांचे पालन करून हा जयंती उत्सव आपण उत्साहात साजरा करूया. यासंदर्भात आवश्यक ते परिपत्रक गृह विभागाच्यावतीने लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सहयाद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत सांगितले. महापरिनिर्वाण दिनाप्रमाणेच 14 एप्रिल रोजी राज्यशासनामार्फत हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यास गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मान्यता दिली आहे. त्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देशही प्रशासनाला दिले आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 एप्रिल रोजी रोजी होणाऱ्या 131 व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसंदर्भात आज सहयाद्री अतिथीगृह आयोजित बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्यप्रणाली व्दारे उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, गेली दोन वर्षे डॉ. बाबासाहेबांची जयंती उत्सव व पुण्यतिथीनिमित्त अभिवादन अशा दोन्हीही कार्यक्रमात आपण कोरोना निर्बंधांमुळे अतिशय संयम पाळला आणि नियमांचे काटेकोर पालन केले, ही खरोखरच खूप महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे. आता हे कोरोनाचे सावट कमी झाले आहे आणि या महामानवाची जयंती आपणा सर्वांना उत्साहाने साजरी करायची आहे.

महानगरपालिका आणि पोलीस यांनी नेहमीप्रमाणे संपूर्ण नियोजन व तयारी केली आहे. राज्यभरातदेखील उत्साहाने तसेच आरोग्याचे नियम पाळून हा उत्सव साजरा करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले की, आरोग्य नियमांचे पालन करूनच जयंती साजरी करावी लागणार आहे. साधारण परिस्थितीत आपण ज्या प्रथा-परंपरा पाळून जयंती साजरी करतो, त्या सर्व गोष्टी तितक्याच सन्मानपूर्व केल्या जाणार आहेत. आपण सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुयायी आहोत त्यामुळे जयंती उत्सवाच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना मुंबई महापालिका आणि राज्य शासनाच्यावतीने करण्यात येणार आहेत. राज्य शासनाच्यावतीने 14 एप्रिल बाबतच्या मार्गदर्शक सूचना आगामी चार दिवसात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तैयारी साठी सर्वांना पुरेसा वेळ मिळेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. महापरिनिर्वाणदिनाप्रमाणे जयंती दिनी राज्य शासनाच्यावतीने चैत्याभूमी येथे हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टीच्या मागणी यावेळी मान्य करण्यात येऊन त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना गृहमंत्री वळसे-पाटील यांनी मुख्य सचिव आणि संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.

या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मत्स्यव्यवसाय विकास मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख, राज्यमंत्री संजय बनसोडे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ तथा माजी राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्याचे प्रधानसचिव विकास खारगे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, नगरविकास विभागाचे प्रधानसचिव डॉ. महेश पाठक, गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे, कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील, राष्ट्रीय उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमप, विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था विश्वास नांगरे-पाटील, मुंबई रेल्वेचे पोलीस आयुक्त कैसर खालिद, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर व इतर वरिष्ठ अधिकारी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, आनंदराज आंबेडकर, डॉ.भदंत राहुल बोधी, रवी गरूड, मयुर कांबळे, महेंद्र साळवे यासंह अन्य समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar's birth anniversary to be celebrated after two years.

बातमी व अपडेट साठी loktantrakiawaaz.co.in वर क्लिक करा.