माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना आणि इंडिया 24 न्यूज चॅनल चा दुसरे वर्धापण दिना निमित्ते भव्यदिव्य सत्कार सोहळा संपन्न...
#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, 24 फरवरी : आंतरराष्टीय मानवाधिकार राजदूत संघटना, माहिती अधिकार, पोलीस मित्र , पत्रकार संरक्षण सेना व इंडिया 24 न्यूज नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमानाने वर्धापन दिन व भव्यदिव्य सत्कार सोहळा दिनांक 27 फेब्रुवारी 2022 ला ग्रीन सिलेब्रेशन हॉल मध्ये संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे उदघाटक मा. डॉ. अविनाशजी सकुंडे, संस्थापक /आंतरराष्टीय अध्यक्ष होते.प्रमुख पाहुणे मा सॊ. सुनीता लोंढिया माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक चंद्रपूर महानगरपालिका, प्रमुख अतिथी -मा.डॉ. कैलासदादा पठारे, राष्टीय अध्यक्ष, मा. श्री. तुळशीराम जांभुळकर - महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा मुख्य संपादक, मा. सॊ. जयश्रीमाई सावर्डेकर, राष्ट्रीय अध्यक्षा,( पोलीस मित्र.)मा. सॊ शिल्पाताई बनपूरकर - महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा, मा. श्री. अरुणभाऊ माधेशवार- महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, मा. सॊ. कीर्ती पांडे - महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे आदरणीय सत्कार मूर्ती मा. सॊ. श्रुती लोणारे (डॉग मम्मी ) सामाजिक कार्यकर्ते, मा. डॉ. प्रवीण येरमे सामाजिक कार्यकर्ते रुग्णालय गडचांदूर , मा. कुमारी आकांशा अभय आगलावे, मिस डिवा, गोविंदवार यांना प्रथम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.आणि अपंग मुलाला तीन चाकी सायकल देण्यात आले.
तसेच चंद्रपूर येथील प्रिंट मीडियाचे जिल्हा प्रतिनिधी मा.श्री. प्रशांत विज्ञानेश्वर जिल्हा प्रतिनिधी नवराष्ट्र, मा.श्री. जितेंद्र जोगड मुख्यसंपादक लोकतंत्र की आवाज, मा.श्री. राजेश नायडू - मुख्य संपादक- पार्थशर , मा.श्री. आशिष रेंच उपसंपादक - चांदा ब्लास्ट , मा. श्री. मोरेश्वर उधोजवार - मुख्य संपादक वृत्तांत न्यूज , मा. श्री खोमदेव तूम्मेवार - मुख्य संपादक महाराष्ट्र मत , या मान्यवरांचे विविध क्षेत्रातील आमच्या संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. तरी या कार्यक्रमाला आमंत्रित व निमंत्रित सन्मानित मान्यवर उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढविली. त्यावेळी लहान मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम ( डाँन्स ) घेण्यात आले. माहिती अधिकार, पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण सेना व इंडिया 24 न्यूज चे पदाधिकारी व पत्रकार बंधूनी सहकार्य करून कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी मदत केली. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आले. आभार प्रदूषण डॉ. इस्माईल पठाण यांनी केले. सर्व मान्यवर व सत्कार मूर्तींनी दुसऱ्या वर्धापन दिनाच्या प्रतिक्रिया देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
A grand felicitation ceremony was held on the occasion of the second anniversary of Right to Information, Police Friend and Journalist Protection Army and India 24 News Channel ...