पुणे येथे 7 मार्च ला होणार ना. कपिलजी पाटील, मंत्री पंचायत राज भारत सरकार यांचा हस्ते होईल पुरस्कार प्रदान
#Loktantrakiawaaz
चंद्रपुर: महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशन च्या माध्यामातून महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व सभापती यांचा कार्यकाळातील केलेल्या महत्वपूर्ण कामगिरीचा गौरव व्हावा या उद्देशाने पुणे असोसिएशन मार्फत अर्ज संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून जि.प सदस्य, सभापती तसेच पं.स सदस्य व सभापती यांचे कार्य व महत्वपूर्ण कामगिरी यांची माहिती अर्ज स्वरूप मागविण्यात आलेली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातील उत्कृष्ट ३ जि.प सभापती पुरस्कारात प्रथम क्रमांकावर माजी जि.प समाजकल्याण सभापती तथा तत्कालीन जि.प सदस्य ब्रिजभूषण पाझारे यांची निवड झालेली आहे. हि जि.प चंद्रपूर करिता अभिमानाची बाब आहे.
सन २०१७ मध्ये जि.प समाजकल्याण सभापती पदा हाती घेतले व माजी वित्तमंत्री मा.आ.सुधीरभाऊ मूनगंटीवार यांच्या मार्गदर्शनातून जनतेसाठी विविध कार्य व योजना आखून जिल्हातील नागरिकांना लाभ मिळून दिला. त्यामध्ये १० हजार घरकुल मंजूर करून “मागेल त्याला घरकुल” या निश्चयावर ठाम राहून जिल्ह्यात कार्य घरकुल अतिरिक्त घरकुल मिळून दिले. ग्रा.प स्थळावर अखर्चित असलेल्या अपंग राखीव ३% निधी जिल्हा अपंग कल्याण निधी मध्ये जमा केले व जिल्हातील अपंग व्यक्तीना १००० स्वचलीत साईकलचे वितरीत करण्यात आले. ग्रा.प उत्पन्न निधी मार्फत राखीव असलेल्या दलित वस्ती विकास कार्याला पुढाकार घेऊन दलित वस्ती विकास घावून आणला. व गावात नागरिकांनकरिता RO, हायमास्ट चे कार्य पूर्ण केले. जिल्हापरिषद क्षेत्रातील प्रत्येक गावात जि.प निधी मंजूर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान उभारले. नकोडा गावातील राम मंदिर देवस्थानाचे सुशोभिकरण, लाइटीग ची व्यवस्था करून दिली. त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्हातील तीर्थ क्षेत्र असलेले वढा गावात मा.आ.सुधीरभाऊ मूनगंटीवार यांचा मार्फत सभागृह बांधकाम व नदीच्या तीरापर्येंत पायऱ्याचे बांधकाम करण्यास पुढाकार घेतला. तसेच “मी सभापती बोलतोय..!”, मान आपुलकीचा, सन्मान कार्याचा, एक दिवस पाच गाव भेट, सरपंच संवाद अश्या विविध नाविन्य पूर्ण उपक्रम राबवून ग्रा.प व पंचायत समिती मार्फत गावातील प्रलंबित असलेल्या कार्याला गती देऊन ते पूर्ण करण्यात यश मिळविले. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये बिरजू पाझारे लोकप्रिय झाले.
नकोडा या छोट्याश्या गावातील आलेले ब्रिजभूषण पाझारे कठोर मेहनत व लोकांमध्ये स्वताच्या निस्वार्थी सेवे मुळे तसेच कार्यामुळे लोकप्रिय झाले. पंचायत समिती सदस्य, सभापती तसेच जि.प सदस्य ते सभापती पदाच्या मानकरी होण्यासाठी त्यांनी जनसेवेत स्वताला बहाल करून टाकले. नेहमी नागरिकांच्या हितासाठी झटणारे व सदैव कार्यशील असणारे आपले ब्रिजभूषण पाझारे 7 मार्च ला महाराष्ट्रातील ३ उत्कृष्ट सभापती मधील प्रथम स्थानी पुरस्कृत होत आहे. हि खरोखरच चंद्रपूर जिल्हासाठी अभिमानाची बाब आहे.
Brijbhushan Pajare honored with Maharashtra's Best Speaker Award, will be held on March 7 in Pune. The award will be presented by Kapilji Patil, Minister of Panchayat Raj, Government of India.
खबरों और अपडेट के लिए कृपया loktantrakiawaaz.co.in पर क्लिक करें.